आवक वाढली, दर कोसळले; झेंडू शेतकऱ्यांचा संघर्ष वाढला, खर्चही निघणे झाले कठीण
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
यंदा बाजारात झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने दर घसरले असून, त्यांच्या हातात अवघे 40 हजार रुपयांचेच उत्पन्न राहिले आहे. परिणामी मेहनतीच्या या शेतीतून जेमतेम खर्च निघाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर: फुलंब्री तालुक्यातील शेतकरी रामदास वाघ हे गेल्या चार वर्षांपासून एक एकर क्षेत्रात झेंडू फुलाची शेती करत आहेत. मागील वर्षी झेंडूला चांगला बाजारभाव मिळाल्याने त्यांना सुमारे एक लाख रुपयांचे समाधानकारक उत्पन्न मिळाले होते. मात्र यंदा बाजारात झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने दर घसरले असून, त्यांच्या हातात अवघे 40 हजार रुपयांचेच उत्पन्न राहिले आहे. परिणामी मेहनतीच्या या शेतीतून जेमतेम खर्च निघाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
फुलंब्रीतील शेतकरी रामदास वाघ हे सुरुवातीच्या काळात भाजीपाल्याची शेती करत होते. मात्र काही नवीन पीक घ्यावं म्हणून आणि मित्रांचे पाहून व मार्गदर्शन घेऊन झेंडू या फुलाची लागवड केली. जवळपास चार वर्षांपासून ते झेंडू फुलाची शेती करत आहे. झेंडू लागवड केल्यानंतर सुरुवातीला फुलांना चांगला दर मिळाला मात्र गेल्या एक-दोन वर्षापासून दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. तरी देखील गेल्या वर्षी 40 ते 50 रुपये किलो दराने भाव मिळाले होते. यंदा अधिक शेतकरी झेंडू शेतीमध्ये आले.
advertisement
त्यामुळे बाजारात फुलांची आवक जास्त झाली आवक वाढल्याने उत्पन्न कमी मिळाले असे देखील रामदास वाघ यांनी म्हटले आहे. जवळपास एक एकर क्षेत्रामध्ये झेंडूची शेती केल्यानंतर कमीत कमी खर्च निघून 40 ते 50 हजार रुपये नफा मिळायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये दसऱ्यासाठी झेंडूची लागवड केली होती. गणेशोत्सवामध्ये फुलांना समाधानकारक भाव मिळाला मात्र दसऱ्याला भाव घसरला परिणामी उत्पन्न कमी झाले.
advertisement
शेतकऱ्यांनी झेंडू शेती करायला हवी का?
झेंडू फुलांची शेती शेतकऱ्यांनी करायला हवी ही शेती फायदेशीर आहे. मात्र यामध्ये बाजारभावानुसार उत्पन्न मिळते, बाजारात फुलांची आवक जास्त झाल्यामुळे भाव कमी होतो तर आवक कमी झाली की भाव समाधानकारक मिळतो मात्र बाजार भाव कधी स्थिर राहत नसतो. तर कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे देखील उत्पन्नामध्ये चढ-उतार होऊ शकतो. त्यामुळे या शेतीत नफाच मिळेल असे देखील नाही काही वेळेला तोटा देखील सहन करावा लागतो.
advertisement
बाजारामध्ये झेंडू फुलांच्या बाबतीत आवक कमी असल्यास दोन दिवसांमध्येच 70 ते 80 रुपयांपर्यंत भाऊ जातो. मात्र बाहेरच्या जिल्ह्यातून फुलं छत्रपती संभाजीनगर बाजारात आली तेव्हा फुलांचा भाव 20 ते 30 रुपयांवर भाव घसरतो, अशी प्रतिक्रिया देखील वाघ यांनी दिली.
Location :
Maharashtra
First Published :
Dec 15, 2025 9:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
आवक वाढली, दर कोसळले; झेंडू शेतकऱ्यांचा संघर्ष वाढला, खर्चही निघणे झाले कठीण









