Garlic Price Today : सणासुदीच्या दिवसात फोडणी महाग, लसूण खातोय भाव, हे आहे कारण
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
लसणाची फोडणी दिली की स्वयंपाक छान आणि टेस्टी होतो. पण सध्याला लसणाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. 300 ते 500 रुपये किलोपर्यंत हे भाव गेलेले आहेत.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : लसणाची फोडणी दिली की स्वयंपाक छान आणि टेस्टी होतो. पण सध्याला लसणाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. 300 ते 500 रुपये किलोपर्यंत हे भाव गेलेले आहेत. तर लसणाची एवढी भाव वाढ कशी झालेली आहे? या मागची नेमकी काय कारण आहेत? ही भाव वाढ किती दिवस राहणार आहे? याविषयीची माहिती लसूण विक्रेते सागर कुंड यांनी सांगितली आहे.
advertisement
आता पितृपक्ष, दसरा, दिवाळी हे सण एका मागोमाग येणार आहेत. आणि ऐन सणासुदीच्या काळामध्ये लसणाचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत. सध्याला किरकोळ बाजारामध्ये लसूण 300 ते 500 रुपये किलोपर्यंत विक्री होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी लसणाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. यावर्षी अनेक ठिकाणी पाऊस हा मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आहे. त्यामुळे देखील लसणाचे मोठे प्रमाणात नुकसान झालेलं आहे. यामुळे देखील ही भाव वाढ झालेली आहे, असं विक्रेते सागर कुंड यांनी सांगितले आहे.
advertisement
एकदा लागवड केली की 10 वर्षे बघायला नको, सोलापूरचा शेतकरी कमावतोय 3-4 लाख रुपये!
त्यासोबतच यावर्षी शेतकऱ्यांनी देखील कमी प्रमाणमध्ये लसणाची लागवड केली होती. सध्या लसणाला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. लसणाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. पण लसणाची आवक ही कमी झालेली आहे. आणि अजून दोन ते तीन महिने ही भाव वाढ अशीच राहील. दिवाळीनंतर नवीन लसणाची आवक येते त्यानंतर थोडीशी भाव वाढ कमी होण्याची शक्यता आहे. लसणाची एवढी मोठी भाव वाढ झाल्यामुळे सध्याला ग्राहकांची संख्या देखील कमी झालेली आहे, असं विक्रेते सागर कुंड यांनी सांगितलेले आहे.
advertisement
लसणाची मोठ्या प्रमाणात भाव वाढ झाल्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना घेणे परवडत नाहीये आणि ही भाव वाढ अजून काही दिवस अशीच राहील असे देखील सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे अजून काही दिवस तरी गृहिणींना लसणाची फोडणी देता येणार नाहीये.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
September 21, 2024 6:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Garlic Price Today : सणासुदीच्या दिवसात फोडणी महाग, लसूण खातोय भाव, हे आहे कारण

