Sambhajinagar News : देवपूजा करताना घात झाला, दिव्याच्या वातीला साडीचा पदर लागताच महिला होरपळली, उपचारादरम्यान मृत्यू

Last Updated:

Shocking Accident News : देवपूजा करताना एक दुःखद अपघात घडला. दिव्याच्या वातीला महिला साडीचा पदर लागताच ती होरपळली. परिसरातील लोकांनी तिला तातडीने मदत केली.मात्र रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झालेला आहे.

दिव्यातून उठलेल्या ज्योतीने घेतला जीव 
दिव्यातून उठलेल्या ज्योतीने घेतला जीव 
छत्रपती संभाजीनगर : धार्मिक वातावरणातील आनंदाचे क्षण क्षणात काळ्या सावटात बदलले. एक चूक, एक ठिणगी आणि एका तरुण आईचे आयुष्यच भस्मसात झाले. कुटुंब आठ दिवस आशेवर टिकून होतं, पण नियतीशी झालेल्या लढाईत ती शेवटी हरली.
‎सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावात धार्मिक पूजेच्या वेळी लागलेल्या आगीत भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुर्गा कैलास दिवटे (वय ३३) यांचे नाव या मृत महिलेचे असून, त्यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. दिवटे यांच्या घरी मागील आठवड्यात धार्मिक विधी सुरू होते. घरातील वातावरण मंगलमय होते. पूजा करताना दिव्याजवळील साडीचा पदर चुकून ज्योतीला स्पर्श झाला आणि क्षणभरात साडीने पेट घेतला. आगीत त्या गंभीर भाजल्या.
advertisement
‎नातेवाइकांनी तातडीने त्यांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
‎आठ दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या दुर्गा दिवटे यांनी अखेर बुधवारी सायंकाळी प्राण सोडले. या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हवालदार अनंत जोशी करत आहेत.अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे आमठाणा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Sambhajinagar News : देवपूजा करताना घात झाला, दिव्याच्या वातीला साडीचा पदर लागताच महिला होरपळली, उपचारादरम्यान मृत्यू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement