अजित पवारांच्या हस्ते बारामती पॉवर मॅरेथॉनचा शुभारंभ, दादांनी बनवला 360 अँगल Video
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
बारामतीमध्ये आज म्हणजेच रविवारी पॉवर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवारांचीही उपस्थिती होती. येथील अजित पवारांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
बारामती, 26 नोव्हेंबर : आज बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित 'बारामती पॉवर मॅरेथॉन' स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सहभागी झाले होते. यावेळी 360 अँगलने दादांचा व्हिडीओ बनवण्यात आला. त्यानंतर अजितदादांनी स्पर्धेकांना शुभेच्छा दिल्या व त्यांचं मनोबल वाढवलं.
देशामध्ये तालुका पातळीवर पहिल्यांदाच अशा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. यामुळे क्रिडा प्रेमी आनंदात आहेत. तालुका पातळीवर पहिल्यांदाच वर्ल्ड अॅथलेटिक असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्थरावरील मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. या मॅरेथॉनमध्ये 42 किमी, 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी फन रन या कॅटेगिरीमध्ये हजारो स्पर्धकांचा समावेश अृआहे. यासोबतच वयोगटानुसार 8 लाखांची बक्षिसं देखील यामध्ये आहेत.
advertisement
...जेव्हा अजितदादा चक्क 360 अँगलने व्हिडीओ बनवतात...!#AjitPawar pic.twitter.com/6gft3L1kZ8
— News18Lokmat (@News18lokmat) November 26, 2023
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकताच डेंग्यू झाला होता. यामधून बरे झाल्यानंतर ते पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमासाठी बारामतीमध्ये आले होते. बारामती पॉवर मॅरेथॉनच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर अजित पवार हे शहरातल्या परिसरामधील विकासकांचा आढावा घेणार आहोत. यासोबतच सहयोग सोसायटी मधील निवासस्थानी जनता दरबार देखील भरणार आहे.
view commentsLocation :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
November 26, 2023 1:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांच्या हस्ते बारामती पॉवर मॅरेथॉनचा शुभारंभ, दादांनी बनवला 360 अँगल Video


