अर्जावर आक्षेप घेतल्याने उमेदवार चिडला, १५ जणांसोबत घरासमोर धुडगूस घातला, बीडमध्ये राडा

Last Updated:

पोलिसांनी 15 जणांच्या टोळक्याविरोधात माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड निवडणूक
बीड निवडणूक
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड: निवडणूक अर्जावर आक्षेप घेतल्याने उमेदवाराला शिवीगाळ करून त्याच्या घरासमोर धुडगूस घातल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या माजलगावमध्ये उघडकीस आला असून प्रकरणात 15 जणांच्या टोळक्याविरोधात माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव येथील तहसील कार्यालयात नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने छाननी प्रक्रिया सुरू होती. यावेळी शेख तौफिक अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सहाल चाऊस यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवल्यानंतर सायंकाळी सहा वाजता सहल चाऊस यांच्या गटाने शेख तौफिक यांच्या घराच्या समोर फटाके वाजवून शिव्या देत धुडगूस घातला.
advertisement
असद चाऊस, जैद असद चाऊस आणि त्यांच्या अनोळखी १० ते १५ सहकाऱ्यांनी तौफिक यांच्या घरासमोर येऊन सहाल चाऊस यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप का घेतला या कारणावरून शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अर्जावर आक्षेप घेतल्याने उमेदवार चिडला, १५ जणांसोबत घरासमोर धुडगूस घातला, बीडमध्ये राडा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement