Beed News: वाल्मिक कराडला मोठा दणका, राईट हँड गोट्या गीत्तेवर मकोका; बीड पोलिसांची कारवाई

Last Updated:

वाल्मिकला पुण्याहून बीडला आणण्यात आले त्यावेळी गोट्या गित्ते हा त्यांच्या ताफ्यात होता, त्याच्यावरही मकोका लावण्यात आला.

Gotya Gitte -Walmik Karad
Gotya Gitte -Walmik Karad
बीड :  गेल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगारीच्या घटनांनी बदनाम होत असल्याचे चित्र आहे. बीडमध्ये कायद्याचे राज्य नसून जंगलराज सुरू असल्याचा आरोप होत असताना बीड जिल्ह्यात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत गुन्हेगारांना चपराक बसवण्यासाठी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडसह त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर आता आणखी एका टोळीवर मकोका लावण्यात आला आहे. परळी व अंबाजोगाई भागात दहशत निर्माण करुन धुमाकूळ घालणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
तडोळी येथील शेतकऱ्याला मारहाण करत गंभीर जखमी केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारावाई करण्यात आली आहे. रघुनाथ फड, जगन्नाथ फड, सुदीप सोनावणे , बालाजी दहिफळे, विलास गित्ते, धनराज उर्फ राजेभाऊ फड आणि ज्ञानदेव उर्फ गोट्या गित्ते या सात जणांच्या टोळीवर मकोका लावण्यात आला आहे. या टोळीने आजपर्यंत संघटितरीत्या पो. स्टे. परळी शहर, संभाजीनगर आणि अंबाजोगाई ग्रामीण हद्दीत एकूण 10 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
advertisement

आरोपींवर कोणते गुन्हे दाखल?

विशेष म्हणजे मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेले सर्व गुंड वाल्मिक कराडचे समर्थक आहे. एवढंच नाही तर ज्यावेळी वाल्मिकला पुण्याहून बीडला आणण्यात आले त्यावेळी गोट्या गित्ते हा त्यांच्या ताफ्यात होता. तर सुदीप सोनवणे हा बीड कारागृहात कराड आणि गित्ते गँग यांच्या झालेल्या वादाचे कारण होता. या टोळीतील गोट्या गित्ते आणि धनराज उर्फ राजेभाऊ फड हे दोन आरोपी फरार आहेत. तसेच या टोळीने अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, दंगा करणे, कट रचणे, अवैध शस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे, दरोडा टाकणे, रस्ता अडवणे, मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, गंभीर दुखापत करणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.
advertisement

नेमकं काय आहे प्रकरण?

परळीच्या तडोळी येथील सहदेव वाल्मीक सातभाई ट्रॅक्टरचे काम करण्यासाठी आणि हप्ता भरण्यासाठी 2 लाख 70 हजार रुपये घेऊन मोटार सायकलवर चालले होते. परळीच्या शिवाजी चौकातून सातबारा आणण्यासाठी जलालपूर रोडवरील तलाठी कार्यालयाकडे जात होते. दरम्यान त्याचवेळी आरोपींनी पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ वाटेत आडवी घातली. स्कॉर्पिओमधून एका वेळी सात ते आठ जण काठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन उतरले आणि सातभाई यांना गाडीवरून ओढत खाली पाडले. सातभाई यांना खाली पाडल्यानंतर त्यांच्या तोंडावर आणि पाठीवर काठीने सपासप वार केले तसेच लोखंडी रॉडने त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर मारले. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले त्यानंतर त्यांच्या पॅन्टच्या खिशातील २ लाख ७० हजार रुपये काढून घेतले,
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed News: वाल्मिक कराडला मोठा दणका, राईट हँड गोट्या गीत्तेवर मकोका; बीड पोलिसांची कारवाई
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement