Beed : पुतण्यांसमोर काकांची माघार, दोन भावांमध्ये होणार लढत

Last Updated:

Maharashtra Election 2024 : बीडमध्ये काका पुतण्यांनी अर्ज दाखल केल्यानं या मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र काका पुतण्यांच्या लढाईत काकांनी माघार घेतलीय.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड :  विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्यानं महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी वाढली होती. बहुतांश ठिकाणी बंड थंड करण्यात पक्षांना यश आलंय. बीडमध्ये मात्र दोन पुतण्यांच्या विरोधात काकांनी अर्ज दाखल केल्यानं एकाच कुटुंबातले तिघे जण आमने सामने होते. बीडमध्ये काका पुतण्यांनी अर्ज दाखल केल्यानं या मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र काका पुतण्यांच्या लढाईत काकांनी माघार घेतली असून दोन भावांमध्ये आता लढत होणार आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अर्ज मागे घेतला आहे.
advertisement
अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातल्या बीड मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. राष्ट्रवादीनं योगेश क्षीरसागर यांना तिकीट दिलंय. तर शरद पवार गटाकडून योगेश यांचे चुलत भाऊ विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना तिकीट देण्यात आलंय. तर जयदत्त क्षीरसागर यांनीही अर्ज भरला होता. पण आता त्यांच्या माघारीमुळे दोन भावांमध्ये ही लढत होणार आहे. आता कोणत्या पुतण्याला काका रसद पुरवणार हे बघावं लागेल.
advertisement
गेल्यावेळी काकांना पुतण्याची धोबीपछाड
जयदत्त क्षीरसागर यांनी २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला होता. पण २०१९ च्या निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आणि शिवसेनेत प्रवेश केला.तेव्हा शिवसेनेनं त्यांना मंत्रीपदही दिलं. पण २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणाऱ्या त्यांच्या पुतण्याने संदीप क्षीरसागर यांनी विजय मिळवला होता.
advertisement
क्षीरसागर कुटुंबाची २५ वर्षांपासून सत्ता
बीड शहरात गेल्या दोन ते तीन दशकांपासून क्षीरसागर कुटुंबियांची एकहाती सत्ता आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, आमदारकीची पदं घरातील व्यक्तींकडेच आहेत. दरम्यान, भावांमध्ये संघर्षामुळे क्षीरसागर कुटुंबात फूट पडल्यानंतर काका-पुतण्या आमने-सामने आले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed : पुतण्यांसमोर काकांची माघार, दोन भावांमध्ये होणार लढत
Next Article
advertisement
Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement