Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी आवाहन करूनही ऐकलं नाही; बीडमध्ये आणखी एका कार्यकर्त्याने आयुष्य संपवलं

Last Updated:

बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे आणखी एका कार्यकर्त्याने त्याचं आयुष्य संपवलं आहे.

पंकजा मुंडेंनी आवाहन करूनही ऐकला नाही; बीडमध्ये आणखी एका कार्यकर्त्याने आयुष्य संपवलं
पंकजा मुंडेंनी आवाहन करूनही ऐकला नाही; बीडमध्ये आणखी एका कार्यकर्त्याने आयुष्य संपवलं
सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड : बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे आणखी एका कार्यकर्त्याने त्याचं आयुष्य संपवलं आहे. बीडच्या शिरूर येथील गणेश बडे या युवकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यापासून तो नैराश्येत होता, यातून त्याने गळफास घेतल्याचं नातेवाईकांनी सांगितलं आहे. पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर चिंचेवाडी, दिघोळ आंबा इथल्या युवकांनी जीवन संपवलं होतं, यानंतर ही तिसरी घटना आहे.
advertisement
दरम्यान पंकजा मुंडे यांनी चिंचेवाडी येथे जाऊन जीवन संपवलेल्या वायबसे या कार्यकर्त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. कार्यकर्त्याच्या कुटुंबाला भेटल्यानंतर पंकजा मुंडे यांनाही अश्रू अनावर झाले.
'जीवन संपवू नका, मला लढण्यासाठी बळ द्या. आयुष्य संपवणं थांबलं नाही तर मी राजकारण सोडून देईन. पुढच्या 100 दिवसांमध्ये सगळं चित्र बदलून टाकू', असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
advertisement
धनंजय मुंडेंनीही घेतली भेट
बीड लोकसभा निवडणुक पंकजा मुंडे यांचा अवघ्या काही हजार मतांनी पराभव झाला. याठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे विजयी झाले. या लढतीचा निकाल राज्यात सर्वात शेवटी लागला. त्यामध्ये, पंकजा मुंडेंचा 6 हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे, पंकजा मुंडेंच्या समर्थकांची मोठी नाराजी झाली. आपल्या नेत्या पंकजाताईंचा पराभव झाल्याने अनेकांनी मतदार मतमोजणी केंद्रावरच अश्रू ढाळले. तर, बीड जिल्ह्यात या पराभवाचे पडसादही पाहायला मिळाले. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आयुष्य संपवलं. आष्टी तालुक्यातील एका युवकाने पराभव सहन न झाल्याने जीवन संपवलं, त्याच आष्टी तालुक्यातील पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन पंकजा मुंडेंनी अश्रू पुसले. दरम्यान, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही या पोपटराव वायभासे तरुणाच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तसेच, पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी उचलली.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी आवाहन करूनही ऐकलं नाही; बीडमध्ये आणखी एका कार्यकर्त्याने आयुष्य संपवलं
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement