Beed News: धक्कादायक! एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर हल्ला, घरात घुसून मारहाण

Last Updated:

विलास मस्के यांच्या पालवन येथील घरी पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला.

News18
News18
बीड: बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी थांबता थांबेना अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यामधील मारहाणीचे व्हिडिओ अन् गावगुंडांच्या दहशतीच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक विलास मस्के यांच्या घरावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात विलास मस्के गंभीर जखमी झाले असून बहीण भाग्यश्री सोजे यांच्या हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. दोघांवरही खाजगी रुग्णाला उपचार सुरू आहेत..
विलास मस्के यांच्या पालवन येथील घरी पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही नेमका हल्ला कोणी केला का केला पोलीस तपासात समोर येणार आहे. मारहाणीत विलास मस्के गंभीर जखमी असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत आहे. धारधार शस्त्राने वार करत ही मारहाण करण्यात आली आहे. बीड जवळील पालवन येथे विलास मस्के यांचे घर आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात टोळक्यांनी घराचा दरवाजा ठोकून त्यांना बाहेर काढलं.
advertisement

विलास मस्के यांची प्रकृती गंभीर

एकनाथ शिंदे यांच्या युवा सेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्यासोबत बीड मधील वैद्यकीय मदत कक्षाचे गेल्या तीन वर्षांपासून मस्के हे काम पाहतात. विलास मस्के हे जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याने या प्रकरणात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. विलास मस्के यांची प्रकृती गंभीर असून धारदार शस्त्राचे वार आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
advertisement

आरोपींना तात्काळ अटक करा, कुटुंबियांची मागणी

एकीकडे बीडचे नवे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न करत असतानाच बीडमध्ये आता हा प्रकार समोर आल्याने मोठी खबळळ उडाली आहे. आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed News: धक्कादायक! एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर हल्ला, घरात घुसून मारहाण
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement