Suresh Dhas: बीडच्या जमीन घोटाळ्यात मोठा ट्विस्ट! सुरेश धस यांच्यावर दाखल गुन्ह्यात पोलिसांचा नवा अहवाल
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:SURESH JADHAV
Last Updated:
Beed News : सात देवस्थानांच्या इनाम जमिनी बेकायदेशीर खालसा करून हस्तांतरित केल्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस व त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बीड: आष्टी तालुक्यातील पिंपळेश्वर, विठोबा, खंडोबा यासारख्या सात देवस्थानांच्या इनाम जमिनी बेकायदेशीर खालसा करून हस्तांतरित केल्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस व त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता मोठी अप़डेट समोर आली आहे.
advertisement
सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी सुरेश धस यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप केला होता. तत्कालीन विधान परिषद सदस्य असताना सुरेश धस यांनी पदाचा गैरवापर करून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार केली व ती देवस्थानांच्या जमिनी नातेवाईक व कार्यकर्त्यांच्या नावावर करून शासन व देवस्थानाची फसवणूक केली असल्याचा आरोप खाडे यांनी केला.
advertisement
सुरेश धसांना मोठा दिलासा
बीड जिल्ह्यातील आष्टी येथील देवस्थान इनाम जमीन बेकायदेशीर खालसा व हस्तांतरण करून विक्री केल्याच्या गुन्ह्यातून माजी राज्यमंत्री सुरेश धस व इतरांना वगळल्याचा अहवाल पोलिसांनी विशेष न्यायालयात दाखल केला. यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी खाडे यांनी दाखल केलेली फौजदारी याचिका आणि धस यांचा फौजदारी अर्ज निकाली काढला.
advertisement
या अहवालावर उत्तर दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाने तक्रारदार राम खाडे यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला असल्याचे शासनाच्यावतीने मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी निदर्शनास आणून दिले.
मंत्रिपदाच्या काळात लोकसेवक म्हणून काम करत असताना राज्यमंत्री सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका येथील पिंपळेश्वर देवस्थान, विठोबा देवस्थान आदी एकूण 7 ठिकाणच्या देवस्थान इनाम जमिनी बेकायदेशीर खालसा केल्या. यामध्ये गैरव्यवहार केल्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये फौजदारी याचिका दाखल करून धस व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आष्टी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली सुरेश धस, प्राजक्ता सुरेश धस, मनोज रत्नपारखी, देवीदास धस, अस्लम नवाब खान आणि इतरांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता.
advertisement
या प्रकरणाचा तपास लाचलुचपत विभागाकडून करण्यात आला होता. आतापर्यंत 7 वेळा आरोपपत्र आणि पुरवणी आरोपपत्र दाखल झाले. मात्र, पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी अहवाल दाखल करून सुरेश धस, त्यांची पत्नी आणि इतरांना गुन्ह्यातून वगळले आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
August 28, 2025 11:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Suresh Dhas: बीडच्या जमीन घोटाळ्यात मोठा ट्विस्ट! सुरेश धस यांच्यावर दाखल गुन्ह्यात पोलिसांचा नवा अहवाल


