Santosh Deshmukh: 'माझे वडील गेले आता तुम्ही आमचा परिवार', संतोष देशमुखांच्या दोन्ही मुलं ढसाढसा रडली, लेकीचे शब्द ऐकून रेणापूर हळहळले
- Published by:Prachi Amale
Last Updated:
तुमची खंबीर साथ अतिशय महत्त्वाची आहे. आज दु:खाच प्रसंग आहे, तुम्ही सर्व आमचं दु:ख वाटून घेण्यासाठी आला आहात, असे बोलत असताना वैभवीला अश्रू अनावर झाले आहे.
बीड: केज तालुक्याचे मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापलं आहे. हत्येला 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटून गेले मात्र अद्याप या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे त्यामुळे सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. आता या घटनेविरोधात लातूर जिल्ह्यातील रेणापुरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतेय. या मोर्चात संतोष देशमुख यांची दोन्ही मुलं सहभागी झाली होती.आमच्या वडिलांना न्याय द्या असे म्हणत संतोष देशमुखांच्या लेकीला हुंदका अनावर झाला. दोन्ही मुलांना रडताना पाहून उपस्थित सर्व जण हळहळले.
माझ्या वडिलांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्याच्यासोबत काय झाले हे सर्वांना माहीत आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही इथे आलात, असेच कायम आमच्यासोबत उभे राहा. तुमची खंबीर साथ अतिशय महत्त्वाची आहे. आज दु:खाच प्रसंग आहे, तुम्ही सर्व आमचं दु:ख वाटून घेण्यासाठी आला आहात, असे बोलत असताना वैभवीला अश्रू अनावर झाले आहे.
advertisement
माझे वडील कायम गावासाठी झटले : वैभवी देशमुख
वैभवी पुढे म्हणाले, माझ्या वडिलांसाठी गाव हे काय प्रथम स्थानी होते. ते कायम गावासाठी झटत होते.आमच्या गावाने अनेक पुरस्कार जिंकले आहे. माझे वडिल समाजसेवक होते. त्यांनी आजपर्यंत समाजासाठी सर्वकाही केलं. गावामध्ये स्वच्छता अभियान देखील राबवले. तुम्ही असेच आमच्या पाठिशी राहा, कुटुंब म्हणून सोबत राहा,
advertisement
माझे वडील आम्हाला सोडून गेले, आता तुम्ही आमचा परिवार; देशमुखांचा आक्रोष
तुम्ही सर्वजण माझे कुटुंब आहात मी तुम्हाला माझ्या परिवाराचा हिस्सा मानते. त्यामुळे प्रत्येक मोर्चाला तुम्ही याच संख्येने उपस्थित राहा. माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. जे आरोपी आहेत, त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. माझ्या वडिलांसोबत जो गुन्हा झाला, तो पुन्हा घडू नये , जी वेळ माझ्या कुटुंबावर आली ती कधीच कोणाच्या कुटुंबावर येऊ नये. आता आमचे वडील आम्हाला सोडून गेले आहेत. तुम्ही एक कुटुंब म्हणून साथ द्या, सदैव असेच आमच्या पाठिशी उभे राहा, असे देखील वैभवी या वेळी म्हणाली.
Location :
Latur,Maharashtra
First Published :
Dec 27, 2024 3:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh: 'माझे वडील गेले आता तुम्ही आमचा परिवार', संतोष देशमुखांच्या दोन्ही मुलं ढसाढसा रडली, लेकीचे शब्द ऐकून रेणापूर हळहळले










