advertisement

Beed Video :'कोयता आणा रे', बीडच्या शिवराजला टॉर्चर करतानाचा आणखी एक Video समोर, खाली झोपवून...

Last Updated:

Beed News: अनोळखी तरुणांनी त्याला जगदिश्वराच्या डोंगरावरून खाली उतरवले. नंतर तिथेच तरुणाला बेदम मारहाण केली होती.

News18
News18
बीड:  परळीत तरुणाचे अपहरण करून टोकवाडी परिसरात अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.पाच ते सात तरुण काठी बेल्टने अमानुष मारहाण करत आहेत.यावेळी तरुण वेदनांनी विव्हळत आहे. मारहाण करताना त्याचा चित्रीकरण देखील केला जात आहे.. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या मारहाणीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
शिवराज दिवटे हा तरुण त्याच्या मित्रासोबत एका कार्यक्रमाला गेला होता. जेवण करत असताना काही अनोळखी व्यक्तींसोबत त्याचे किरकोळ भांडण झाले होते. या भांडणाची कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. गावाकडे परत निघालेल्या शिवराज दिवटेला पेट्रोलपंपाजवळ गाठून काही ओळखीच्या व काही अनोळखी तरुणांनी त्याला जगदिश्वराच्या डोंगरावरून खाली उतरवले. नंतर तिथेच तरुणाला बेदम मारहाण केली होती.
advertisement

काय आहे नव्या व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये समाधान मुंडे आणि इतर आरोपीकडून त्याला अमानुष मारहाण झाल्यानंतर खाली पाडून त्याला हात जोडून माफी मागण्यास सांगितली आहे. शिवराजला हात जोडून सगळी हकीकत पहिल्यापासून शेवटपर्यंत काय काय घडलं ते सांगण्यास सांगितले. शिवराज वारंवार मला माहिती नाही, मी ओळखत नाही, मी मारलं नाही असे म्हटल्यावर कोयता घेऊन या रे असे म्हणत वारंवार धमकी देण्यात येत आहे.
advertisement

Watch Video : 

शिवराजने सांगितली आपबिती

मी माझ्या मित्रांसोबत अखंड हरिनाम सप्ताहाला गेलो होतो. त्या ठिकाणी काही लोकांचं भांडण झालं होतं. मला त्या संदर्भात काहीच माहिती नव्हती. परंतु त्यानंतर मी गावी परतत असताना आमच्या दुचाकीला चार ते पाच जणांनी अडवलं. त्यांनी मला दुसऱ्या दुचाकीवर बसवून रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात घेऊन गेले. त्या ठिकाणी मला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. मारहाण करताना ते याचा संतोष देशमुख पार्ट टू करू असं म्हणत होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed Video :'कोयता आणा रे', बीडच्या शिवराजला टॉर्चर करतानाचा आणखी एक Video समोर, खाली झोपवून...
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement