धक्कादायक... महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याकडून चक्क बीडच्या पोलीस अधीक्षकांची फसवणूक
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Beed News: शासकीय कागदपत्रात छेडछाड आणि भूमिगत केबलचे पत्र लपवल्याचे पोलिस तपासणी अहवालात समोर आले आहे.
सुरेश जाधव, बीड: महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांनी चक्क बीडच्या पोलीस अधीक्षक यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय कागदपत्रात छेडछाड आणि भूमिगत केबलचे पत्र लपवल्याचे अहवालात समोर आले आहे.
आंबेजोगाई तालुक्यातील पूस येथे खासगी मालकीच्या जमिनीतून विद्युत लाईन ओढण्यासाठी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पोलिस संरक्षण मागितले. यावेळी त्यांनी शासकीय कागदपत्रात छेडछाड आणि भूमिगत केबलचे पत्र लपवल्याचे पोलिस तपासणी अहवालात समोर आले आहे. शासकीय कागदपत्रात छेडछेड करून महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी चक्क बीडच्या पोलीस अधीक्षकांची फसवणूक केली.
त्यामुळे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले असताना गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत आहे. पोलिस अधीक्षक यांची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करावा अशी मागणी श्रीकर फड यांनी केली आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Jul 08, 2025 6:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धक्कादायक... महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याकडून चक्क बीडच्या पोलीस अधीक्षकांची फसवणूक









