बीडमध्ये सैतानी कृत्य! महिला सरपंचसह कुटुंबावर गंभीर हल्ला, 15 ते 20 जण अचानक घुसली अन्...
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Attack On Beed women Sarpanch : महिला सरपंचाच्या घरात 15 ते 20 हल्लेखोरांच्या जमावाने सरपंच आणि त्यांच्या कुटुंबातील एकूण आठ जणांवर जीवघेणा हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
Attack On Beed Sarpanch : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील वसंतनगर येथे एका महिला सरपंचासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर 15 ते 20 जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात कुटुंबातील सुमारे 5 ते 7 जण जखमी झाले असून, त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नेमकं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 15 ते 20 हल्लेखोरांच्या जमावाने सरपंच आणि त्यांच्या कुटुंबातील एकूण आठ जणांवर जीवघेणा हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांत तक्रार दाखल
advertisement
या गंभीर हल्ल्याबाबत राठोड कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पीडित कुटुंबाने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जखमींवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, या घटनेमुळे वसंतनगर आणि परळी तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी आणि त्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
view commentsLocation :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
July 15, 2025 10:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
बीडमध्ये सैतानी कृत्य! महिला सरपंचसह कुटुंबावर गंभीर हल्ला, 15 ते 20 जण अचानक घुसली अन्...


