Beed : बीडमध्ये रक्ताचा सडा! भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू, महामार्गावर मृतदेहांचा खच
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Beed Accident News : बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय.
Beed Accident News : बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहराजवळ मध्यरात्री झालेल्या एका थरारक अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भीषण घटनेने संपूर्ण गेवराई तालुक्यावर शोककळा पसरली असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गुरुवारी (मंगळवार, २५ मे २०२५) मध्यरात्रीच्या सुमारास गेवराई शहरानजीकच्या गढी पुलावर एका एसयूव्ही गाडीचा दुभाजकाला किरकोळ अपघात झाला.
अनियंत्रित ट्रकची जोरदार धडक
या अपघातात गाडीतील कोणालाही कोणतीही दुखापत झाली नव्हती. मात्र, दुभाजकात अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे हे सर्वजण खाली उतरले. ते गाडीच्या दुरुस्तीची किंवा तिला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची व्यवस्था करत असतानाच, महामार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.
advertisement
तातडीने रुग्णालयात दाखल पण...
हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकच्या धडकेने अक्षरशः हे सहाही जण चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाही सुरू केली. या अपघातात आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
advertisement
महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न
दरम्यान, एका किरकोळ अपघातानंतर मदतकार्यासाठी खाली उतरलेल्या निरपराध सहा जणांचा अचानक मृत्यू झाल्याने गेवराई शहरात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
May 27, 2025 7:28 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed : बीडमध्ये रक्ताचा सडा! भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू, महामार्गावर मृतदेहांचा खच









