advertisement

वसुलीचा बीड पॅटर्न, पैशाच्या वसुलीसाठी चटके देण्याची धमकी; व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Last Updated:

बॅगमध्ये सुसाईड नोट आढळली असून यामध्ये दोघा जणांना व्याजाने दिलेले पैसे परत दे म्हणून उचलून नेऊन चटके देण्याची धमकी दिली होती.

News18
News18
बीड : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी थांबता थांबेना अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यामधील मारहाणीचे व्हिडिओ अन् गावगुंडांच्या दहशतीच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. एकीकडे बीडचे नवे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न करत असतानाच बीडमध्ये आता वसुलीचा आणखी एक पॅटर्न समोर आला आहे. व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी अपहरण करत चटके देण्याची धमकीला घाबरून पाटोद्यात व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.
व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी अपहरण करत चटके देण्याची धमकी दिली आहे. त्या धमकीला घाबरून पाटोद्यात व्यापाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपी फरार आहेत. यानंतर कुटुंबीयांनी जीवाला धोका होण्याची भीती व्यक्त केली.

आरोपी अटक न झाल्यास कुटुंबीयांच्या जीवाला धोका 

बीडच्या पाटोदा येथील व्यापारी संजय कांकरिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.  यावेळी त्यांच्या गाडीच्या बॅगमध्ये सुसाईड नोट आढळली असून यामध्ये दोघा जणांना व्याजाने दिलेले पैसे परत दे म्हणून उचलून नेऊन चटके देण्याची धमकी दिली होती. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. आता या प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात अमृत भोसले व दीपक साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दोघेही फरार आहेत तर दुसरीकडे या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली असून हे आरोपी अटक न झाल्यास कुटुंबीयांच्या देखील जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.
advertisement

गावातील तरुणाला मारहाण करताना व्हिडिओ का काढला?

बीड तालुक्यातील आहेर वडगाव येथून आणखी एक मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय.. जुन्या भांडणातून आनंद शिंदे आणि त्याच्या साथीदारांकडून गावातील जयराम तावरे नामक तरुणाला मारहाण सुरू होती.. या मारहाणीचा व्हिडिओ का काढलास? असा जाब विचारत कृष्णा रोहिटे या तरुणाला देखील मारहाण झाली.. सध्या जिल्हा रुग्णालयात कृष्णावर उपचार सुरू आहेत..
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
वसुलीचा बीड पॅटर्न, पैशाच्या वसुलीसाठी चटके देण्याची धमकी; व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement