पतीचं निधन जिव्हारी लागलं, बीडमध्ये पत्नीनं केला करुण अंत, तान्ह्या बाळाला घरात....
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
बीड जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पतीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने एका २२ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं आहे.
बीड : बीड जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पतीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने एका २२ वर्षीय विवाहितेने आपल्या तान्ह्या बाळाला घरात सोडून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना आष्टी तालुक्यातील खिळद येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. स्वाती नंदू नागरगोजे गर्जे असे या मृत विवाहितेचे नाव आहे.
काही महिन्यांपूर्वीच पाटोदा तालुक्यातील घुगेवाडी येथील नंदू नागरगोजे यांचा विवाह आष्टी तालुक्यातील खिळद येथील स्वाती गर्जे यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर हे दोघेही पुण्यात शेवाळवाडी येथे राहत होते. स्वाती गर्भवती असल्याने तीन महिन्यांपूर्वी ती आपल्या आई-वडिलांकडे खिळद येथे आली होती. चार दिवसांपूर्वी स्वातीचा पती नंदू नागरगोजे यांनी पुण्यातील आपल्या भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पतीच्या निधनाचा धक्का स्वातीला बसला. पतीचा अंत्यविधी आणि सावडण्याचे कार्यक्रम आटोपल्यानंतर कुटुंब बुधवारी खिळद येथील घरी परतले.
advertisement
पतीच्या विरहाने स्वाती पूर्णपणे खचून गेली होती. याच दुःखातून तिने गुरुवारी पहाटे आपल्या काही दिवसांच्या तान्ह्या बाळाला घरात झोपलेले सोडून घराच्या जवळ असलेल्या एका विहिरीत उडी घेतली आणि आपला जीवनप्रवास संपवला. ही घटना सकाळी लक्षात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव सातव, पोलीस अंमलदार शिवदास केदार आणि कृष्णा लव्हारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला आणि पुढील कार्यवाहीसाठी धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Aug 15, 2025 12:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
पतीचं निधन जिव्हारी लागलं, बीडमध्ये पत्नीनं केला करुण अंत, तान्ह्या बाळाला घरात....









