वाल्मीक कराडचा पाय खोलात! संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मदत करणाऱ्या 'विश्वासू' चेल्यावर कारवाई, पुणे कनेक्शन समोर
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
MCOCA on Beed Phad Gang : वाल्मीक कराडच्या फड गँगवर मकोका लावण्यात आला आहे. यामध्ये सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये फरार असलेला गोट्या गिते हा तर वाल्मीकला बीडहून पुण्याला आणताना त्याच्या ताफ्यात होता.
Walmik karads Phad Gang Gotya Geete : मस्साजोगचे सरपंच वाल्मीक कराड यांच्या हत्येनंतर आता बीडमधील संघटीत गुन्हेगारीवर मुसक्या आवळ्या जात आहेत. वाल्मीक कराडच्या फड गँगवर कारवाई करत आता पोलिसांनी मकोका लावला आहे. मागच्या पाच महिन्यांत बीड पोलिसांनी चार गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. अशातच फड गँगच्या गोट्या गिते याच्यावर देखील मकोका लावण्यात आलाय. पण संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मीक कराडला पुण्यात पोहोचण्यास मदत करणाऱ्या गोट्या गिते याच्यावर देखील कारवाईचा बडगा उगाण्यात आला आहे.
रघुनाथ फड गँगवर मकोका
रघुनाथ फड गँग टोळीतील सर्वजण हे वाल्मीक कराडचे समर्थक होते. गोट्या गिते हा तर वाल्मीकला बीडहून पुण्याला आणताना त्याच्या ताफ्यात होता, अशी माहिती समोर आली होती. गोट्या गिते वाल्मीकचा विश्वासू माणूस होता. तर, सुदीप सोनवणे हा कारागृहात वाल्मीक कराड आणि गिते गँग यांच्यात झालेल्या वादाचे कारण होता. सुदीप सोनवणेमुळेच तुरूंगात वाद झाला होता, अशी माहिती तपासात समोर आली. काही दिवसांपूर्वी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले गँगवर मोक्का लावला होता. यानंतर आठवले गँग, भोसले गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.
advertisement
परळी, अंबाजोगाई तालुक्यांत दहशत
रघुनाथ फड हा या टोळीचा म्होरक्या आहे. या टोळीने परळी व अंबाजोगाई तालुक्यात दहशत निर्माण केली होती. मागील १० वर्षांत या टोळीवर १० गुन्हे नोंद असून ९ गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत तर १ गुन्हा तपासावर आहे. हे सर्व गुन्हे ३ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेले आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, दुखापत, दंगा, अवैध शस्त्र बाळगणे, सरकारी कामात अडथळा, दरोडा, जबरी चोरी, मारहाण, गंभीर दुखापत, रस्ता अडवणे असे गुन्हे आहेत.
advertisement
7 जणांवर मकोका, 5 जणांना अटक
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी एका तरूणावर प्राणघातक हल्ला करुन त्याच्याकडील २ लाख ७० हजारांची रक्कम काढून घेतल्याच्या गुन्ह्यात परळीतील रघुनाथ फड गँगवर संघटीत गुन्हेगारी कायदा (मोक्का) नुसार कारवाई करण्यात आली आहे. या गँगच्या ७ जणांवर मकोका लागला असून यातील ५ जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील चौघांना यापूर्वी जामीन मिळाला आहे. यातील एक आरोपी सध्या कारागृहात आहे. तर दोन आरोपी फरार आहेत.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
May 12, 2025 8:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
वाल्मीक कराडचा पाय खोलात! संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मदत करणाऱ्या 'विश्वासू' चेल्यावर कारवाई, पुणे कनेक्शन समोर









