Beed Crime : वाल्मिक कराडला 'जोर का झटका', तुरूंगातील मुक्काम वाढला; कोर्टातून आली मोठी माहिती

Last Updated:

Santosh Deshmukh murder case : वाल्मिक कराडकडून दोषमुक्तीसाठी सादर करण्यात आलेल्या अर्जावर कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावलाय.

वाल्मिक कराड
वाल्मिक कराड
Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख खून प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. या प्रकरणात सर्वच आरोपींनी दोषमुक्तीसाठी (Discharge Application) अर्ज सादर केले आहेत, ज्यामुळे सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच वाल्मिक कराडकडून दोषमुक्तीसाठी सादर करण्यात आलेल्या अर्जावर कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावलाय.
या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद करत आहेत. आरोपींकडून एक-एक करून दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केले जात असल्याने, सुनावणी अनावश्यकपणे लांबवली जात आहे, असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला आहे. यामुळे न्यायालयाचा वेळ वाया जात असून, प्रकरणाचा निकाल लवकर लागावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी व्यक्तीची देखील हत्या झाल्याचा खळबळजनक दावा विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केला आहे. बांगर यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा सहभागी असल्याचा दावा केला होता. महादेव मुंडे हत्या प्रकरणात जो समोर येईल त्याला संपवण्याचे काम वाल्मीक कराड आणि त्याच्या गँगने केले आहे, असा आरोप देखील करण्यात आलाय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Crime : वाल्मिक कराडला 'जोर का झटका', तुरूंगातील मुक्काम वाढला; कोर्टातून आली मोठी माहिती
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement