Devendra Fadnavis: पूरग्रस्त भागातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, फडणवीस सरकारची मोठी घोषणा

Last Updated:

29 जिल्हे 253 तालुक्यांना 2059 मंडळांना सरसकट मदत केली आहे. पडलेली घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

News18
News18
मुंबई :  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. जमिन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना 47 हजार मदत करण्यात येणार असून .हंगामी बागायतीला हेक्टरी 32,500 तर कोरडवाहूला 18,500 रुपयांची मदत जाहीर करण्यात येणार आहे. तसेच पूरग्रस्त भागातील शाळा- कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा देखील राज्य सरकारने घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही तिघांनी बसून हा निर्णय घेतला आहे. काही खर्च कमी करून हे पॅकेज दिले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचे भवितव्य खंडित होऊ नये ही आमचे प्रयत्न सुरू आहेत. शाळा - कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

६८ लाख ६९ हजार हेक्टर पिकाचे नुकसान : देवेंद्र फडणवीस

advertisement
देवेंद्र फडणवीस म्हणाले अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागाचे मोठे नुकसान झाले आहे. आम्ही जागेवर जाऊन पाहणी केली, दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तातडीची मदत म्हणून धान्य वाटप व इतर मदत दिली. 2200 कोटी देऊन पीक नुकसानीबाबत पावले उचलली आहे. अनेक ठिकाणी जमिन खरवडून गेली आहे. झालेल्या नुकसानाची शंभर टक्के नुकसानभरपाई शक्य नाही. नुकसानभरपाई भरपाईबाबत पॅकेज बनवलं आहे.  ६८ लाख ६९ हजार हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पूर्णतः काही ठिकाणी अंशतः नुकसान झाले आहे.
advertisement

29 जिल्हे 253 तालुक्यांना 2059 मंडळांना सरसकट मदत : देवेंद्र फडणवीस

29 जिल्हे 253 तालुक्यांना 2059 मंडळांना सरसकट मदत केली आहे. पडलेली घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून तरतूद करण्यात आली आहे. डोंगरी भागातील घरांना दहा हजार अधिकची मदत देण्यात येणार आहे. नुकसान झालेल्या प्रत्येक घटकाला मदतीची तरतूद करण्यात आली आहे. 47 हजार एकरी खरवडून गेलेल्या जमिनींना मदत करण्यात येणार आहे. प्रति विहीर 30 हजार रुपये तसेच ग्रामीण भागातील बाधित झालेल्या पायाभूत सुविधांसाठी १५०० कोटीची घोषणा करण्यात आली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
advertisement
सरकारने छोटी मोठी मदत करण्यास सुरुवात केली. आम्ही सातत्याने जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, याचा विचार करत होतो. आम्ही अनेक बाबींचा विचार केल्यानंतर चार गोष्टींवरील खर्च कपात करू पण शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis: पूरग्रस्त भागातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, फडणवीस सरकारची मोठी घोषणा
Next Article
advertisement
OTT Crime Thriller: 2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
    View All
    advertisement