Beed : बीडमध्ये महायुतीत ठिणगी? भाजप नेत्याचा घड्याळाविरोधात प्रचाराचा इशारा

Last Updated:

Beed : पंकजाताई आणि पक्षाला विचारून मी बीड जिल्ह्यामध्ये घड्याळाच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं आष्टीतील भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी म्हटलंय.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड : बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत आहे. महायुतीत राष्ट्रवादीने बाळासाहेब आजबे यांना उमेदवारी दिलीय. तर भाजपच्या सुरेश धस यांनीही अर्ज दाखल केलाय. सुरेश धस यांचा प्रचार भाजप नेत्या पंकजा मुंडेसुद्धा करत आहेत. दरम्यान, सुरेश धस यांनी केलेल्या विधानामुळे आता महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पंकजाताई आणि पक्षाला विचारून मी बीड जिल्ह्यामध्ये घड्याळाच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय.
advertisement
भाजपच्या भीमराव धोंडे यांनी बंडखोरी केलीय. तेसुद्धा आष्टी मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यावरूनही सुरेश धस यांनी खळबळजनक असा दावा केला आहे. आष्टीच्या अपक्षच्या मागे कोण याच्या क्लीप माझ्याकडे आहेत. तसंच बीडच्या आष्टी मतदार संघात महायुतीचा उमेदवार असताना घड्याळाचां उमेदवार ऊभा करणे हे मोठे षडयंत्र असल्याचं धस म्हणाले.
पंकजाताई आणि पक्षाला विचारून मी बीड जिल्ह्यामध्ये घड्याळाच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं भाजपचे नेते सुरेश धस यांनी सांगितलं. बीडच्या आष्टी मतदार संघात महायुतीचा उमेदवार घोषित झालेला असताना षडयंत्र करून शेवटच्या दिवशी हे फॉर्म दिला. हे खूप मोठे षडयंत्र माझ्या विरोधात सुरू आहे. मला रोखण्यासाठी हे सर्व केलं जात असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला.
advertisement
माझ्या विरोधात घड्याळाचं चिन्ह आहे तर बीड जिल्ह्यात जिथे जिथे घडयाळ उभे आहे तिथे तिथे घड्याळाच्या विरोधात प्रचार करण्याची परवानगी मागितली आहे. तसेच घड्याळाच्या नेत्यावर मी बोलायला सुरुवात करणार आहे. मी बोलायची सुरुवात करणार नाही पण त्याचा शेवट मी करणार असं म्हणत भाजप उमेदवार सुरेश धस यांनी इशारा दिला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed : बीडमध्ये महायुतीत ठिणगी? भाजप नेत्याचा घड्याळाविरोधात प्रचाराचा इशारा
Next Article
advertisement
Dahanu Nagar Parishad Election Result : मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गुलाल उधळला?
मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु
  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

View All
advertisement