Sinnar NagarParishad Election 2025 : राजीनामा दिलेल्या माणिकराव कोकाटेंच्या सिन्नरमधला धक्कादायक निकाल, भाजपला डिवचूनही घड्याळाची टिकटिक वाजली
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Sinnar NagarParishad Election 2025 : सिन्नर नगरपरिषदेची निवडणूक राज्यात चर्चेचा विषय ठरली. त्याचं कारण म्हणजे सत्ताधारीच एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) शिवसेना ( शिंदे गट) हे स्वबळावर लढले. तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडूनही निवडणूक लढवण्यात आली.
नाशिक : सिन्नर नगरपरिषदेची निवडणूक राज्यात चर्चेचा विषय ठरली. त्याचं कारण म्हणजे सत्ताधारीच एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) शिवसेना ( शिंदे गट) हे स्वबळावर लढले. तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडूनही निवडणूक लढवण्यात आली. मात्र अशातच आता अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विठ्ठल राजे उगले विजयी झाले आहेत. शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले, तर भाजपचे फक्त 2 नगरसेवक निवडून आले आहेत.
नगराध्यक्षपदाची 5 उमेदवार
सिन्नर नगरपरिषदेची निवडणूकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी प्रमुख 5 उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळाली. भाजपकडून हेमंत वाजे, ठाकरे गटाकडून प्रमोद चोथवे, अजित पवार गटाकडून विठ्ठल राजे उगले, शिंदे गटाकडून नामदेव लोंढे तर अपक्ष म्हणून किशोर देशमुख यांनी निवडणूक लढवली.
महायुतीमध्ये संघर्ष
यंदा सिन्नरमध्ये महायुतीतच मोठा संघर्ष पाहायला मिळाला. निवडणुकीआधी भाजपने सिन्नरमध्ये मोठा पक्षप्रवेश सोहळा करून अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांची कोंडी केली. भाजप पहिल्यांदाच पूर्ण ताकदीने निवडणुकीमध्ये उतरली. एकूणच अजित पवार यांना शह देण्याचा प्रयत्न भाजपने केला. तर शिंदे गटानेही आपले नशीब आजमावले.
advertisement
मंत्री माणिकराव कोकाटे वादात
निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा आरोप आणि प्रत्यारोपाने चांगलाच गाजला. राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल राजे उगले यांच्या प्रचारार्थ सिन्नर मध्ये आयोजित सभेत महायुतीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विरोधी पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत असताना मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षावरही सडकून टीका केली.
भाजपला डिवचलं होतं
view commentsमाणिकराव कोकाटे यांनी आपल्या भाषणात भाजपवर हल्लाबोल केला होता. भाजपने विधानसभा निवडणुकीत माझ्या घरातील व्यक्ती फोडला, आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कुटुंबातील व्यक्ती फोडला. भाजप हा पूर्णपणे बाटलेला पक्ष आहे. फोडा फोडीत भाजपचे आयुष्य चालले असून, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र घरी बसले आहे अशी जळजळीत टीका कोकाटे यांनी केली. इतकचं नाही तर आपल्याला खोटं बोलता येत नाही, म्हणून माझं खातं बदललं पण मी दादांचा पठ्ठ्या आहे. आपला वादा पक्का आहे असेही कोकाटे म्हणाले होते. मात्र सिन्नरच्या जनतेने कोकाटे यांच्यावर विश्वास ठेवत मोठा विजय मिळवून दिला आहे.
Location :
Nashik [Nasik],Nashik,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 1:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sinnar NagarParishad Election 2025 : राजीनामा दिलेल्या माणिकराव कोकाटेंच्या सिन्नरमधला धक्कादायक निकाल, भाजपला डिवचूनही घड्याळाची टिकटिक वाजली











