सरकारमधील मंत्र्यांकडे पक्षाच्या कामासाठी 'समन्वयक', भाजपचा नवा पायंडा, पहिलं नाव जाहीर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Chandrashekhar Bawankule: सरकारमधील पक्षाच्या प्रत्येक मंत्र्यांकडे पक्षाच्या कामासाठी 'समन्वयक' नियुक्त करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे.
नागपूर : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून या सरकारमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असणे आवश्यक असल्याचे सांगून त्याकरिता पक्षाकडून प्रत्येक मंत्री महोदयांकडे एक स्वीय सहाय्यक हा पक्षाच्या कामासाठी 'समन्वयक' म्हणून नियुक्त केला जाणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे आदेश काढलेले आहेत. तसेच महाराष्ट्र भाजपतर्फे सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयक या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रही त्यांनी प्रसिद्ध केले आहे. भाजपच्या या निर्णयावर विरोधी पक्षाकडून टीका होण्याची शक्यता आहे.
सरकार स्थापन होऊन दोन महिने होत आहेत. या दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी काही सूचना पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझ्याकडे केलेल्या आहेत. कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याकरिता विशेषत्वाने पक्षाकडून अनेकांना समन्वयकपदी संधी देण्यात येणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
सरकारमधील भाजपच्या प्रत्येक मंत्र्यांकडे पक्षाच्या कामासाठी 'समन्वयक'
सरकारमधील पक्षाच्या प्रत्येक मंत्र्यांकडे पक्षाच्या कामासाठी 'समन्वयक' नियुक्त केला जाणार आहे.महाराष्ट्र भाजप तर्फे सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीपत्र जारी केले आहे. सुधीर देऊळगावकर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे माजी स्वीय सहायक आहेत.
advertisement
मंत्र्यांकडील समन्वयकाचे नाव प्रदेश कार्यालयातील मुख्य सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. मंत्र्यांकडील विभागाच्या कामाची आणि कार्यालयात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आठवड्यातून 2 दिवस मुख्य समन्वयक सुधीर देऊळगावकर प्रदेश कार्यालयात उपस्थित राहतील.
हा निर्णय का घेण्यात आला? नवा प्रघात कशासाठी? विरोधी पक्ष आक्षेप घेण्याची शक्यता
advertisement
जिल्ह्यातील विकासकामे आणि कार्यकर्त्यांची कामे सुलभ पद्धतीने व्हावीत यासाठी भाजपने समन्वयक पदाच्या नियुक्तीचा नवा पायंडा पाडला आहे. परंतु सरकारच्या पैशांनी कार्यकर्त्यांच्या कामाच्या स्वरुपात पक्षाचा प्रचार, प्रसार आणि विस्तार करून घेण्याच्या भाजपच्या रणनीतीवर विरोधी पक्ष आक्षेप घेण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
January 22, 2025 10:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सरकारमधील मंत्र्यांकडे पक्षाच्या कामासाठी 'समन्वयक', भाजपचा नवा पायंडा, पहिलं नाव जाहीर


