Amit Shah : सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, निवडणुकीनंतर..., अमित शहांचं CM पदाबाबत मोठं भाष्य

Last Updated:

Amit Shah on Maharashtra CM : महायुतीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. अमित शहा यांना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विचारले असता त्यांनी मोठं विधान केलंय.

News18
News18
मुंबई : भाजपने महाराष्ट्रात विधाननसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं संकल्पपत्र जाहीर केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जाहीर झालेल्या या संकल्पपत्रात २५ वचनं भाजपने दिली आहेत. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार या प्रश्नाला उत्तर दिलं. तसंच गरज पडली तर शरद पवार यांचा पाठिंबा घेणार का यावरही स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवत भाजपने पाठिंबा दिला. त्यानंतर वर्षभराने अजित पवार हेसुद्धा महायुतीत सहभागी झाले. विधानसभा निवडणुकीत महायुतीत हे तिन्ही पक्ष एकत्र मैदानात उतरले आहेत. पण महायुतीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. अमित शहा यांना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विचारले असता त्यांनी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हे तिन्ही पक्ष ठरवतील असं म्हटलं.
advertisement
अमित शहा यांनी सांगितलं की, सध्या महाराष्ट्रात युती सरकार आहे. युती सरकारचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. सध्या एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन ठरवतील.
मुख्यमंत्री कधी ठरणार याचं उत्तर देताना अमित शहा यांनी राजकीय वर्तुळात होत असलेल्या चर्चांवरून खोचक प्रतिक्रिया दिली. युतीचा मुख्यमंत्री निवडणुकीनंतर ठरवू पण आम्ही शरद पवारांना कोणतीच संधी देणार नाही असं म्हणत अमित शहा यांनी शरद पवार यांचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच नसल्याचं स्पष्ट केलं.
advertisement
भाजपच्या जाहीरनाम्यात काय?
काही दिवसांपूर्वीच महायुतीने आपला जाहीरनामा प्रकाशित केला होता. त्यानंतर. आता भाजपकडून आज, आपलं संकल्पपत्र, प्रकाशित करण्यात आले. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते संकल्पपत्र जाहीर करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप आहे. भाजपसाठी अथवा महायुतीसाठी संकल्पपत्र म्हणजे कागदाचे डॉक्युमेंट नसून एक पवित्र दस्ताऐवज आहे. आज दुपारी 12 वाजता एक स्थगिती पत्र जारी होणार आहे. अनेक प्रकल्पांवर त्यांनी स्थगिती दिली होती असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला. आज जनतेचा विश्वास भाजप, महायुतीवर आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amit Shah : सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, निवडणुकीनंतर..., अमित शहांचं CM पदाबाबत मोठं भाष्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement