Eknath Khadse : '...म्हणून त्यांनी आजारपणाचं नाटक केलं', महाजनांचा खडसेंवर गंभीर आरोप
- Published by:Shreyas
Last Updated:
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आजारपणाचं नाटक केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.
नितीन नांदूरकर, प्रतिनिधी
जळगाव, 23 नोव्हेंबर : कधी काळचे सख्खे मित्र आणि सध्याचे पक्के शत्रू म्हणून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंना ओळखलं जातं. खडसे आणि महाजन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा खडसे आणि महाजनांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. एकेकाळचे भाजपचे वरिष्ठ नेते आणि देवेंद्र फडणवीसांचे सहकारी असलेल्या एकनाथ खडसेंनी मराठा आरक्षणावरुन फडणवीसांवर निशाणा साधला. खडसेंनी जळगावात पत्रकार परिषद घेत,आरक्षणाच्या मुद्यावरुन उपमुख्यमंत्री फडणवीस आणि गिरीश महाजनांना लक्ष्य केलं.
advertisement
'मराठा आरक्षण दिलं नाही तर राजकीय संन्यास घेईल असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं त्यामुळे फडणवीस यांनी त्यांचा तो शब्द पाळावा', असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला. एवढच नाही तर त्यांनी गिरीश महाजन यांनाही चिमटा काढला. सरकारचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांनीही मराठा समाजाला आरक्षणाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं एकनाथ खडसे म्हणाले. खडसेंच्या या वक्तव्यावर गिरीश महाजन यांनीही पलटवार केला. खडसेंना प्रत्युत्तर देताना महाजनांनी खडसेंचं आजारपणच काढलं.
advertisement
'137 कोटींची नोटीस आल्यावर एकीकडे ढोंग करायचे सोंग करायचे, काही झाल नसतांना दवाखान्यात जावून बसायचे, नुसती नोटीस आल्यामुळे कोर्टाकडून सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी आजारपणाचे नाटक केलं, आमच सरकार, आमचे नेते सर्व सांभाळायला समर्थ आहेत, तुम्ही तुमच्या तब्येची काळजी घ्या', असा घणाघात गिरीश महाजन यांनी केला आहे.
हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगरमधून एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईला आणण्यात आलं. मुंबईमध्ये त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. प्रकृती ठीक झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
November 23, 2023 11:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Khadse : '...म्हणून त्यांनी आजारपणाचं नाटक केलं', महाजनांचा खडसेंवर गंभीर आरोप


