Pankaja Munde : नवं सरकार येण्याआधीच पंकजांना महामंडळाचे वेध, मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली
- Published by:Suraj
Last Updated:
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पाथर्डीत प्रचार सभेत बोलताना त्यांची महामंडळाची इच्छा बोलून दाखवली.
अहिल्यानगर : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पाथर्डीत भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलंय. विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच पंकजा मुंडे यांनी मोठी इच्छा व्यक्त केली आहे. आमदार पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, महायुती सरकारनं तुमच्या लेकीवर मोठी जबाबदारी दिलीय. पार्टीनं तिकीटं वाटली पण निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर दिलीय. त्यामुळे सरकार बनवताना तुमच्या या मुलीचा सिंहाचा वाटा असेल. तुम्ही माझ्यासोबत आमदारांना पाठवा. राज्यातील साखर कारखाने अद्याप व्यवस्थित सुरू झालेले नाहीत. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांनी आधी मतदान करावे त्यानंतरच ऊस तोडणीच्या कामाला जावे असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी केलं.
advertisement
राज्यात महायुती सरकार आल्यावर मला ऊसतोडणी महामंडळ मिळाले की तुमच्यावर काही मागायची वेळ येणार नाही, असे सांगत भाजपच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी महामंडळासंबंधीचीही इच्छा बोलून दाखविली आहे. मतदान करा आणि मगच जा यासाठीच मी कोयत्याला धार लावून ठेवा असे बोलले होते. मात्र त्याचा अर्थ काही जणांनी वेगळा लावला. या मतदारसंघात ऊस तोडणी कामगारांची संख्या जास्त आहे. या मतदारसंघात ऊस तोडणी कामगारांना मुंडे यांनी साद घालत महायुतीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 18, 2024 2:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pankaja Munde : नवं सरकार येण्याआधीच पंकजांना महामंडळाचे वेध, मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली










