'निवडणुकीत पैसे वाटले, ऑडिओ निवडणूक आयोगाकडे देऊ' भाजप महिला नेत्याला 30 लाखांसाठी धमकीचा फोन

Last Updated:

भाजपाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सूर्यवंशी यांना मागील काही दिवसांपासून अमन नावाच्या एका भामट्याने फोन करून धमक्या दिल्या होत्या.

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी
पाचोरा : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  पाचोरा येथील भाजप नेत्या वैशाली सूर्यवंशी यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने तुम्ही निवडणुकीत पैसे वाटले, तुमच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार करून असं सांगून वैशाली सूर्यवंशींकडून ३० लाखांची खंडणी मागितली होती. एवढंच नाहीतर या भामट्याने सोशल मीडियावर बदनामीसह ड्रग्ज प्रकरणात गोवण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी  अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सूर्यवंशी यांना मागील काही दिवसांपासून अमन नावाच्या एका भामट्याने फोन करून धमक्या दिल्या होत्या. सूर्यवंशी यांच्याकडून ३० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. हा  प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमन नावाचा व्यक्ती वैशाली सूर्यवंशी यांना मागील चार महिन्यापासून सतत फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करून धमक्या देत होता.
advertisement
विधानसभा निवडणुकीदरम्यान पैसे वाटल्याची बनावट संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर टाकण्याची, तसंच निवडणूक आयोग, CBI, ED व इन्कम टॅक्सकडे तक्रार करण्याचीही धमकी या अमन नावाच्या तरुणाने सूर्यवंशी यांना दिली होती.  वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून  पाचोरा-भडगाव मतदार संघातून विधानसभेची निवडणूक निवडणूक लढवली होती. अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन
पण, मागील चार महिन्यापासून वैशाली सूर्यवंशी यांना अचानक धमकीचे फोन सुरू झाले.  अमन नावाच्या व्यक्तीने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून मागील चार महिन्यापासून सतत फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करून धमक्या दिल्या. निवडणुकीदरम्यान पैसे वाटले, तुमच्याबद्दलच्या ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे. त्या व्हायरल करेल, अशी धमकी या अमनने दिली होती. एवढंच नाहीतर निवडणूक आयोग, CBI, ED आणि इन्कम टॅक्सकडे तक्रार करण्याची धमकीही दिली होती.
advertisement
गाडीत ड्रग्स ठेवण्याची धमकी
हा प्रकार इथंच थांबला नाही, तर या अमन नावाच्या भामट्याने वैशाली सूर्ववंशी यांनी तुमच्या गाडीमध्ये ड्रग्स ठेऊन अडचणीत आणण्याची धमकीही दिली होती. वारंवार धमक्या वाढत असल्यामुळे वैशाली सूर्यवंशी यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'निवडणुकीत पैसे वाटले, ऑडिओ निवडणूक आयोगाकडे देऊ' भाजप महिला नेत्याला 30 लाखांसाठी धमकीचा फोन
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement