BJP vs MNS: उरणमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला आईसमोर मारहाण, रस्त्यात गाठून हल्ला, आमदाराची माफी मागायला लावली

Last Updated:

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात गुरुवारी रात्री भाजपच्या (BJP) स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या (MNS) एका पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

News18
News18
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात गुरुवारी रात्री घडलेल्या एका घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या (BJP) स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या (MNS) एका पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही मारहाण मनसे कार्यकर्त्याच्या आईसमोरच करण्यात आल्याचं बोललं जात आहे. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
संबंधित व्हिडीओत भाजपचे काही पदाधिकारी मनसेच्या पदाधिकाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण करताना दिसून येत आहे. यात एका पदाधिकाऱ्याने मनसे पदाधिकाऱ्याच्या आईला देखील धक्का दिल्याचं व्हिडीओतून दिसून येत आहे. सतीश पाटील असे मारहाण झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. तर, मारहाणीमध्ये सहभागी असणारे सर्व लोक हे भाजपचे स्थानिक पदाधिकारी असल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री मनसेचे पदाधिकारी सतीश पाटील यांना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली. उरणचे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या संदर्भात सतीश पाटील यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याच कारणावरून भाजप कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीदरम्यान सतीश पाटील यांच्या आई देखील उपस्थित होत्या.

माफी मागतानाचा Video व्हायरल

advertisement
या प्रकरणानंतर मारेकऱ्यांनी सतीश पाटील यांनी उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांची जबरदस्तीने माफी मागायला लावली आहे. माफी मागतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उरणमध्ये मनसे देखील आक्रमक झाली आहे. आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पोलिसात तक्रार दाखल

advertisement
या संपूर्ण प्रकरणानंतर मनसेचे पदाधिकारी सतीश पाटील यांनी उरण पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून, पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेबाबत अद्याप भाजप आमदार महेश बालदी यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अशाप्रकारे मारहाण करून माफी मागायला लावल्याने उरणमध्ये राजकीय तणाव वाढला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP vs MNS: उरणमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला आईसमोर मारहाण, रस्त्यात गाठून हल्ला, आमदाराची माफी मागायला लावली
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement