'लाडक्या बहिणींना धमकी दिली नाही, तर...', वादग्रस्त वक्तव्यावर धनंजय महाडिकांचं स्पष्टीकरण
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता.
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी
कोल्हपूर : भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नाव लिहून घ्या आणि आम्हाला पाठवा, त्यांची व्यवस्था आम्ही करू, असं वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केलं. धनंजय महाडिक यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी निशाणा साधला. धनंजय महाडिक यांनी महिलांना धमकी दिल्याचा आरोप विरोधकांकडून केला जाऊ लागला.
advertisement
या वादावर धनंजय महाडिक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं धनंजय महाडिक म्हणाले आहेत. ज्यांना लाभ मिळाला नाही त्याना देण्याची माझी भूमिका होती, असं धनंजय महाडिक म्हणाले आहेत.
धनंजय महाडिकांचं स्पष्टीकरण
view comments'त्यांचा फोटो काढा बंदोबस्त करू, या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. एवढ्यासाठी सांगितलं की या महिलांना कदाचित त्या योजनेचा लाभ मिळाला नसेल, तर आपण त्यांना लाभ देण्याची व्यवस्था करू. हे सांगण्याची माझी भूमिका होती. वक्तव्याचा विपर्यास करण्याचं काम काँग्रेसचं आहे, त्यात चुकीचं काही नाहीये. महायुतीच्या योजनेचा लाभ घ्यायचा आणि मग दुसऱ्याचं गुणगान गायचं, असं कसं? त्यामुळे या महिलांनी आपल्यासोबत राहिलं पाहिजे. ज्या येत नसतील त्यांना कदाचित लाभ मिळाला नसेल, त्यांनाही लाभ मिळावा, ही माझी भूमिका होती', असं धनंजय महाडिक म्हणाले आहेत.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
November 09, 2024 11:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'लाडक्या बहिणींना धमकी दिली नाही, तर...', वादग्रस्त वक्तव्यावर धनंजय महाडिकांचं स्पष्टीकरण


