Manoj Jarange Patil: महापालिका निवडणूक निकालावर मनोज जरांगेंचा अजितदादा आणि शिंदेंना सल्ला, म्हणाले...
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Sachin S
Last Updated:
"अजितदादांनी याच्यातून तरी समजून घेतलं पाहिजे. आपण असे नासके लोक सोबत ठेवले म्हणून आपल्यावर इतकी वाईट वेळ आली...
बीड : महापालिका निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचं पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी पानिपत झालं आहे. भाजपला सोडून स्वबळावर लढल्यामुळे राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. "भाजपने आधी महाविकास आघाडीला संपवलं आता शिंदे आणि अजितदादांचा काटा काढणार आहे, त्यामुळे अजितदादांनी याच्यातून आता तरी समजून घेतलं पाहिजे" असा सल्लावजा टोला मनोज जरांगे यांनी लगावला.
बीडच्या परळीतील मिरवट येथे आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एका धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
"महापालिकेच्या निकालात भाजपवाल्यांनी बघायला काही ठेवलंच नाही, हे लई कलाकार आहेत. पहिली महाविकास आघाडी संपवली. आता शिंदेंचा आणि अजित दादांचा काटा काढला. अजितदादा पण असे लोक सांभाळत आहे. त्यामुळे लोक लांब चालले आहेत, त्यांना आता कळालं. पापी लोकं रक्ताने माखले लोकसोबत ठेवले तर असे परिणाम भोगावे लागतील' असा टोला मनोज जरांगेंनी अजितदादांना लगावला.
advertisement
तसंच, "अजितदादांनी याच्यातून तरी समजून घेतलं पाहिजे. आपण असे नासके लोक सोबत ठेवले म्हणून आपल्यावर इतकी वाईट वेळ आली की, मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही. नाहीतर पुण्यात अजितदादाला इतके कमी यश भेटला नसते. भाजप का जवळ करत नाही यातून अजित पवारांनी काहीतरी शिकावं. दोन नासके सांभाळल्यामुळे मराठा समाज दूर गेला. यामुळे महानगरपालिकेला केवळ मराठ्यामुळेच पडावं लागलं' असा सल्लाही मनोज जरांगेंनी अजितदादांना दिला.
advertisement
'एमआयएम आणि मराठा, दलित एकत्र आले पाहिजे'
" महापालिकेच्या निकालामध्ये एमआयएमला अनेक ठिकाणी यश मिळालं. मुसलमान, दलित, मराठी एक झाले की सगळ्यांचा धुरळा उडतो म्हणूनच मी दलित मुस्लिमांनी मराठ्यांना सांगत असतो की, यांना एकदा पायाखाली चेंगरा 2029 च्या निवडणुकीत होईल असं दिसतं' असंही जरांगे म्हणाले.
महादेव मुंडे प्रकरणात मोठा खुलासा होईल
"महादेव मुंडे प्रकरणात काहीच राहिलं नसतं, आता त्याचा उलगडा व्हायला लागला. त्या प्रकरणाचा खूप मोठा उलगडा होणार आहे. त्याच्यात कुणालाही पाठीशी घातला जाणार नाही, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे नाहीतर ते तोंडावर पडणार आहेत. त्याने हलगर्जीपणा केला तर त्यांच्या मुळावर येणार आहे' असंही जरांगे म्हणाले.
advertisement
जिल्हा परिषद निवडणुकीत सहभाग नाही
"मराठा आंदोलक हे कधीही निवडणुकीत नव्हते. मी विधानसभेत नव्हतो नगरपालिकेतही नव्हतो आणि महानगरपालिकेतून नव्हतो आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही नसणार आहे. मी यापासून अलिप्त आहे. हे सरकार अवघड आहे' असंही जरांगेंनी स्पष्ट केलं.
कुणबी प्रमाणपत्र वाटप कधी?
मराठवाडा हैदराबादचा जीआर निघाला आहे, मात्र प्रमाणपत्र वाटप नाही, अंमलबजावणी झाली पण प्रमाणपत्र वाटत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती दिवस वेड्यात काढतात ते बघू. त्यांना मराठ्याचे मत पडत आहेत. नुसता जीआर काढून मराठ्यांची फसवणूक केली तर मराठी पाडू शकते, महानगर पालिका आल्याने हवेत जाऊ नका, असा इशाराही जरांगेंनी सरकारला दिला.
advertisement
"धनगर आंदोलकांना मदत करा"
दीपक बोराडे यांनी मुंबईत जाईलाच पाहिजे, धनगराच्या लेकरांनी शिकायचं नाही का. पंधरा वर्षांपासून त्यांचे वाटोळ झाला आहे. धनगर, बंजारा, मराठ्याला दिला नाही, मुसलमानाला पण देईनात, धनगर एसटीतून आरक्षण मागत आहे त्यांना आपण अडवायलेत त्यांनी एसटीतून आरक्षण घ्यायचंच. धनगरांनी राजकारण न करता ताकदीने उभारून लेकाचं कल्याण करावं आरक्षण घ्यावं. ते जर मुंबईला जात असतील तर मराठा बांधवांनी रस्त्यात त्यांची पाणी भाकरी जेवणाची व्यवस्था करावी, अशी सूचनाही जरांगेंनी केली.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Bid Rural,Bid,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 11:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil: महापालिका निवडणूक निकालावर मनोज जरांगेंचा अजितदादा आणि शिंदेंना सल्ला, म्हणाले...







