T20 World Cup : रिटायरमेंटच्या वेळी उघडले नशिबाचे दरवाजे, 42व्या वर्षी झाला टी-20 वर्ल्ड कप टीमचा कॅप्टन!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीमची घोषणा व्हायला सुरूवात झाली आहे. या वर्ल्ड कपसाठी 42 वर्षांचा खेळाडू कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे.
मुंबई : भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीमची घोषणा व्हायला सुरूवात झाली आहे. इटलीने त्यांच्या 15 सदस्यीय टीमची घोषणा केली आहे, या टीमचं नेतृत्व 42 वर्षांच्या खेळाडूकडे देण्यात आलं आहे. इटली 9 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर बांगलादेशविरुद्ध टी-20 वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करेल. त्यांचा पुढचा सामना 12 फेब्रुवारी रोजी मुंबईत नेपाळविरुद्ध होईल.
2 जानेवारी 1984 रोजी डर्बन येथे जन्मलेल्या वेन मॅडसेनने 2023 मध्ये इटलीसाठी 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत क्लब क्रिकेट खेळले आहे. मॅडसेनने 253 प्रथम श्रेणी आणि 117 लिस्ट ए सामने खेळले आहेत. पण, टीममधील सर्वात मोठे नाव 37 वर्षीय ऑलराऊंडर जेजे स्मट्स आहे, ज्याने दक्षिण आफ्रिकेसाठी 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि 6 वनडे सामने खेळले आहेत. दुखापतीमुळे एमिलियो गे स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
advertisement
इटलीने युरोप क्वालिफायर 2025 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करून पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपचे तिकीट मिळवले आहे. युरोपमधून इटलीसह नेदरलँड्सही क्वालिफाय झाला आहे. इटली ग्रुप सी मध्ये इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि नेपाळसह आहे.
उल्लेखनीय म्हणजे, वेन मॅडसेनने माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जो बर्न्सची जागा इटलीचा कर्णधार म्हणून घेतली. बर्न्सने ऑस्ट्रेलियासाठी 23 टेस्ट सामने खेळले आणि इटालियन पुरुष क्रिकेट टीमचे नेतृत्व करत क्वालिफायर राऊंडमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. बर्न्सने इटलीसाठी 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात त्याने 45 च्या सरासरीने आणि 140 च्या स्ट्राईक रेटने 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले.
advertisement
इटलीची टीम
वेन मॅडसेन (कर्णधार), मार्कस कॅम्पोपियानो, झियान पिएरो मीडे, जैन अली, अली हसन, क्रिशन जॉर्ज, हॅरी मेनेंटी, एन्थनी मोस्का, जस्टिन मोस्का, सय्यद नकवी, बेन्जामिन मैनेंटी, जसप्रीत सिंग, जेजे स्मट्स, ग्रॅन्ट स्टीवर्ट, थॉमस ड्रेका
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 11:43 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : रिटायरमेंटच्या वेळी उघडले नशिबाचे दरवाजे, 42व्या वर्षी झाला टी-20 वर्ल्ड कप टीमचा कॅप्टन!









