Kolhapur: 7 दिवसांच्या बाळाचं घरी वेलकम करायचं राहुन गेलं, आईचा दुर्दैवी मृत्यू, अख्खं गाव रडलं!
- Published by:Sachin S
Last Updated:
घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली आणि जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान सुवर्णा कुंदेकर यांचा मृत्यू झाला.
ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी
कोल्हापूर: कोल्हापूरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर एका बाळंतणी महिलेला घरी घेऊन जात असताना कारचा अपघात झाला. दोन कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बाळंतणी महिलेचा मृत्यू झाला तर नवजात बाळ जखमी झालं आहे. मात्र, या अपघातात समोरील कारचालकावर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी संरक्षण दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर कानडेवाडी इथं १६ जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली. या अपघातात सुवर्णा राहुल कुंदेकर यांचा मृत्यू झाला. तर २ वर्षांचाा मुलगा रुद्र आणि ७ दिवसांचं नवजात बाळ जखमी झालं होतं. दोघांना गडहिंग्लजमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आता प्रकृती स्थिर आहे.
गुरुवारी दुपारी राहुल कुंदेकर (वय 32) हे आपल्या कारने सुवर्णा राहुल कुंदेकर यांना बाळासह घरी घेऊन जात होते. त्याचवेळी स्वप्निल रानगे यांच्या कारने समोरासमोर धडक झाली. या अपघातात सुवर्णा राहुल कुंदेकर, आरती भाबर आणि नवजात बाळाला दुखापत झाली. घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली आणि जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान सुवर्णा कुंदेकर यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात ज्या कारने धडक दिली ती कार स्वप्निल रानगे यांची होती. रानगे हे चंदगड नगरपंचायतीतील कर निर्धारण अधिकारी आहेत. या अपघातानंतर नेसरी पोलिसांनी संशयित रानगे यांना अटक केली नाही उलट त्यांना संरक्षण दिलं, असा आरोप गावकऱ्यांनी केला.
advertisement
नेसरी पोलीस स्टेशनवर गावकऱ्यांचं आंदोलन
बाळंतणी महिलेचा मृत्यू झाल्यामुळे गावकरी आक्रमक झाले होते. संतप्त गावकऱ्यांनी रानगे यांची कार पेटवून दिली. पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे गावकऱ्यांनी नेसरी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला. बाळंतणीचा अपघातात मृत्यू झाला पण पोलिसानी संशयितला वाचवण्याचा प्रयत्न केला असं म्हणत अडकुर ग्रामस्थांचा नेसरी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला होता. पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेत ग्रामस्थ आक्रमक झाले होते. घटनेची माहिती मिळताच आमदार शिवाजी पाटील यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली.
advertisement
अखेरीस API गाढवेंची बदली
अडकूर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे यांच्यावर कारवाईची मागणी केली. अखेरीस गावकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस प्रशासनाने नेसरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे यांची तडकाफडकी बदली केली. गाढवे यांची आता पोलीस कंट्रोल रूमला रवानगी केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. त्यानंतर मृत बाळंतीण महिलेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघात प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास पोलीस करत आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 10:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur: 7 दिवसांच्या बाळाचं घरी वेलकम करायचं राहुन गेलं, आईचा दुर्दैवी मृत्यू, अख्खं गाव रडलं!










