Pune News: भारत फिरण्याचा प्लॅन आहे का? पुण्यात सुरू आहे ‘पर्यटन महोत्सव’, इथं ऑफर मिळेल खास!
- Reported by:Pooja Satyavan Patil
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
पुण्यात पुणे पर्यटन महोत्सव अर्थात पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव डेक्कन येथील हॉटेल सेंट्रल पार्क येथे सुरू आहे.
पुणे: पुणेकरांसाठी पर्यटनाची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. पुण्यात पुणे पर्यटन महोत्सव अर्थात पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव डेक्कन येथील हॉटेल सेंट्रल पार्क येथे सुरू आहे. या महोत्सवात 70 हून अधिक नामांकित पर्यटन कंपन्यांनी विविध सहलींचे आकर्षक पर्याय सादर केले आहेत. हे प्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. याविषयीची अधिक माहिती प्रथमेश कुलकर्णी यांनी लोकल 18 ला दिली आहे.
प्रथमेश कुलकर्णी यांनी सांगितले की, पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या माध्यमातून पुणे पर्यटन महोत्सव (पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल) आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे यंदा सहावे वर्ष असून यामध्ये जवळपास 70 हून अधिक नामांकित पर्यटन कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या कंपन्यांनी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सहलींची आकर्षक पॅकेजेस सादर करण्यात आली आहेत. प्रदर्शनातील विदेशी पर्यटनाचे पॅकेजेस 29,999 पासून सुरू होत आहेत.
advertisement
याठिकाणी अनेक पर्यटनाचे पर्याय एकाच छताखाली पाहता येणार आहेत. या महोत्सवात देश-विदेशातील सहलींचे विविध पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. कोकणापासून थेट कॅलिफोर्नियापर्यंतच्या अनेक सहलींचे नियोजन येथे करता येणार आहे. महोत्सवाच्या काळात बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना विशेष सवलती दिल्या जाणार आहेत.याशिवाय महोत्सवात लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विविध पर्यटन कंपन्यांकडून आकर्षक योजना सादर केल्या जात आहेत. त्यामुळे पुणेकरांसह परिसरातील नागरिकांनी या पुणे पर्यटन महोत्सवाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रथमेश कुलकर्णी यांनी केले आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 10:26 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: भारत फिरण्याचा प्लॅन आहे का? पुण्यात सुरू आहे ‘पर्यटन महोत्सव’, इथं ऑफर मिळेल खास!








