WPL 2026 : 13 फोर अन् 3 सिक्स, स्मृतीच्या वादळासमोर दिल्लीची धुळधाण, RCB प्ले-ऑफच्या जवळ!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा 8 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. कर्णधार स्मृती मानधनाच्या वादळी बॅटिंगमुळे आरसीबीने हा सामना 8 विकेट राखून जिंकला.
नवी मुंबई : महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा 8 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. कर्णधार स्मृती मानधनाच्या वादळी बॅटिंगमुळे आरसीबीने हा सामना 8 विकेट राखून जिंकला. दिल्लीने दिलेलं 167 रनचं आव्हान आरसीबीने 18.2 ओव्हरमध्येच पार केलं. स्मृती मानधनाने 61 बॉलमध्ये 157.38 च्या स्ट्राईक रेटने 96 रन केले, ज्यात 13 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. याशिवाय जॉर्जिया वॉलने 42 बॉलमध्ये नाबाद 54 रनची खेळी केली. स्मृती आणि जॉर्जिया यांच्यात 142 रनची पार्टनरशीप झाली.
दिल्लीकडून मरिझेन कॅप आणि नंदनी शर्माला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. स्मृती मानधना शतक पूर्ण करेल असं वाटत होतं, पण नंदनी शर्माने तिला 96 रनवर आऊट केलं. या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि त्यानंतर दिल्लीचा 20 ओव्हरमध्ये 166 रनवर ऑलआऊट केला. शफाली वर्माने 41 बॉलमध्ये 62 रन केले, पण दिल्लीची बॅटिंग गडगडली. आठव्या क्रमांकावर आलेल्या स्नेह राणाने 22 आणि नवव्या क्रमांकावर बॅटिंग केलेल्या लुसी हॅमिल्टनने 19 बॉलमध्ये 36 रनची खेळी केली.
advertisement
आरसीबीकडून लॉरेन बेल आणि सायली सतघरे यांना प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या. प्रेमा रावतने 2 आणि नदिने डे क्लार्कने 1 विकेट घेतली.
आरसीबीचा चौथा विजय
डब्ल्यूपीएलच्या यंदाच्या मोसमातला आरसीबीचा 4 सामन्यांमधला हा चौथा विजय आहे, त्यामुळे 8 पॉईंट्ससह आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या मोसमात आरसीबीचे आणखी 4 सामने शिल्लक आहेत, त्यामुळे आरसीबीचं प्ले-ऑफला पोहोचणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. यंदाच्या डब्ल्यूपीएलमधला नवी मुंबईच्या स्टेडियमवरचा हा शेवटचा सामना होता, आता उरलेले सगळे सामने बडोद्यामध्ये खेळवले जाणार आहेत.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 11:19 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
WPL 2026 : 13 फोर अन् 3 सिक्स, स्मृतीच्या वादळासमोर दिल्लीची धुळधाण, RCB प्ले-ऑफच्या जवळ!









