KDMC Video: डोंबिवलीत वाद पेटला! काँग्रेसच्या 70 वर्षीय नेत्याला भाजप कार्यकर्त्यांनी भररस्त्यात नेसवली साडी

Last Updated:

काँग्रेसच्या 70 वर्षीय कार्यकर्त्याला साडी नेसवल्याचे प्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा साडी नेसवलेला फोटो व्हायरल केल्यामुळे संतापलेल्या भाजपाच्या कल्याण-डोंबिवलीमधील कार्यकर्त्यांनी फोटो व्हायरल करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश पगारे यांना भर चौकात गाठून भरजरी साडी नेसवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर कल्याणमधील काँग्रेस आक्रमक झाली असून साडी नेसवणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केली आहे.
काँग्रेसच्या 70 वर्षीय कार्यकर्त्याला साडी नेसवल्याचे प्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे. घडलेल्या प्रकारानंतर स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ गुन्हे नोंदवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्याला सार्वजनिक ठिकाणी साडी नेसवत अपमानजनक वर्तन केल्याचे म्हणत काँग्रेसने या घटनेचा निषेध केला आहे.

गुन्हे दाखल करून अटक करा, काँग्रेसची मागणी

advertisement
काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे म्हणाले, घडलेली घटना अतिशय गंभीर असून साडी नेसवणाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा. तसेच दोषींवर कठोर कारवाई करत चांगलाच धडा शिकवला गेला पाहिजे. कार्यकर्त्यांच्या मागे काँग्रेस पक्ष उभा असून पीडित कार्यकर्त्याला पूर्ण न्याय मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती

कल्याणमधील या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेसमधील वाद अधिकच तीव्र होताना पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांचे स्थानिक प्रतिनिधी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत; भाजपनेही परिस्थितीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
advertisement

साडी नेसवा नाही तर काय पण करा.... मामा पगारेंचा इशारा

या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना मामा पगारे म्हणाले, साडी नेसवा नाही तर काय पण करा, मी काँग्रेससाठी जीव जाईपर्यंत लढणार. या गुंडांना धडा शिकवला जाईल. पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपास सुरु केला असून आवश्यक तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची नोंद दिली आहे. संबंधितांची ओळख पटवून अधिक चौकशी करण्यात येत आहे, असे स्थानिक पोलीस सूत्रांनी सांगितले.
advertisement

नेमकं प्रकरण काय?

काँग्रेसचे कल्याण-डोंबिवलीतील ज्येष्ठ नेते प्रकाश पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसवलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल झाला होता. त्यानंतर आज भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश पगारे यांना आज मानपाडा परिसरात गाठले. त्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पगारे यांना पकडून त्यांना साडी नेसवली
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
KDMC Video: डोंबिवलीत वाद पेटला! काँग्रेसच्या 70 वर्षीय नेत्याला भाजप कार्यकर्त्यांनी भररस्त्यात नेसवली साडी
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement