Buldhana Crime : चार जण आले अन् एटीएम घेऊन पळाले; बुलढाण्यातील धक्कादायक प्रकारानं खळबळ

Last Updated:

बुलढाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी चक्क एटीएम मशिनच लंपास केलं आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
बुलढाणा, राहुल खंडारे प्रतिनिधी : बुलढाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी चक्क एटीएम मशिनच लंपास केलं आहे. संग्रामपूरमध्ये ही घटना घडली आहे. चोरट्यांची ही धाडसी चोरी परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. या एटीएममध्ये तब्बल सतरा लाखांच्या आसपास कॅश असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या चोरीनंतर आता पुन्हा एकदा शहरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरातून चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच लंपास केलं आहे. संग्रामपूर शहरातील जळगाव जामोद रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोरील एटीएम रात्री अंदाजे तीन वाजेच्या दरम्यान  चोरट्यांनी लंपास केले आहे. या एटीएम मशीनमध्ये जवळपास 17 लाख रुपयांची रोकड असल्याचं सांगितलं जातंय.
एका चार चाकी वाहनातून आलेल्या तीन ते चार चोरट्यांनी संग्रामपूरमध्ये ही धाडसी चोरी केली आहे. चोरट्यांनी या ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील फोडले आहेत. या धाडसी चोरीची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana Crime : चार जण आले अन् एटीएम घेऊन पळाले; बुलढाण्यातील धक्कादायक प्रकारानं खळबळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement