Buldhana : मराठा आरक्षणावरुन शिंदे गटातील आमदाराची मंत्री भुजबळांना शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
आमदार गायकवाड यांनी असभ्य भाषेत मंत्री छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याने आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
राहुल खंडारे, बुलढाणा : मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्याने मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार टीका केली होती. या टीकेनंतर छगन भुजबळ यांच्या एका कार्यकर्त्याने आमदार गायकवाड यांना जाब विचारण्यासाठी कॉल केला होता. या कॉलवर आमदार गायकवाड यांनी छगन भुजबळ यांचे नाव घेत शिवीगाळ केली. या कॉलचे रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आमदार गायकवाड यांनी असभ्य भाषेत शिवीगाळ केल्याने आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आमदार संजय गायकवाड यांना कल्याणमधील दुर्गेश बागुल यांनी कॉल केला होता. मराठा आरक्षणाविरुद्ध भूमिका घेतल्यानंतर छगन भुजबळांबद्दल असे वक्तव्य का केले अशी विचारणा दुर्गेश यांनी केली होती. तेव्हा दुर्गेश यांच्याशी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांचा थेट राजीनामा मागितला. सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयाविरुद्ध बोलायचं असेल तर मंत्रिमंडळाबाहेर जाऊन बोला. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्यानं त्यांना मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी मागणी संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली आहे.
advertisement
संजय गायकवाड यांनी म्हटलं की, राज्याच्या मंत्र्याची भूमिका ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात असू शकत नाही. असं असल्यास तो मंत्री पदावर राहण्यासाठी पात्र नाहीय. भुजबळांमध्ये जातीवाद शिरला असल्यास ते मंत्रिपदावर राहू शकत नाहीत असंही संजय गायकवाड म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 01, 2024 3:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana : मराठा आरक्षणावरुन शिंदे गटातील आमदाराची मंत्री भुजबळांना शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल


