Temple: 31 डिसेंबरनिमित्त शेगावचे गजानन महाराज मंदिर 24 तास खुले; अक्कलकोटमध्ये गर्दी
- Written by:Renuka Dhaybar
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Maharashtra Temple: 31 डिसेंबरला शेगावचे गजानन महाराज मंदिर 24 तास खुले राहणार.. भक्तांची गर्दी पाहता मंदिर प्रशासनाने घेतला निर्णय.. नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी लाखो भाविक शेगावमध्ये दाखल होत आहेत.
बुलडाणा: नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी यासाठी विदर्भाची पंढरी मानले जाणारे शेगावमध्ये भक्तांच्या मांदियाळीने फुलून गेले आहे. देशभरातून भाविक शेगावमध्ये दाखल होत आहेत. सकाळपासूनच भाविक गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
भक्तांची गर्दी पाहता गजानन महाराज मंदिर आज 31 डिसेंबर रोजी 24 तास दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे. मोठ्या संख्येनं भाविकांना गजानन महाराज यांचे दर्शन घेता येणार आहे. शेगावचे गजानन महाराज मंदिर देशभरात प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून भाविक शेगावात गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात.
advertisement
तसेच सोलापूरच्या अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या मंदिरातही भाविकांची गर्दी दिसून येत आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी भाविकांनी या वटवृक्ष मंदिरात गर्दी केली आहे. स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी होत आहे. अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीसाठी अक्कलकोट मंदिर समितीकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 31, 2024 12:05 PM IST
मराठी बातम्या/बुलढाणा/
Temple: 31 डिसेंबरनिमित्त शेगावचे गजानन महाराज मंदिर 24 तास खुले; अक्कलकोटमध्ये गर्दी









