Buldhana : ट्रॅक्टरमधून खाली पडले मायलेक, डोळ्यादेखत चाकाखाली चिरडला मुलगा तर आईचाही मृत्यू
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
ट्रॅक्टरवरून पडल्यानंतर मुलाचा जागीच मृत्यू झाला तर आई सोनी चव्हाण या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
राहुल खंडारे, बुलढाणा, 22 डिसेंबर : ट्रॅक्टरवरून पडून ८ वर्षीय चिमुकल्यासह आई सोनी चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. पतीने दारुच्या नशेत होता आणि त्याने ट्रॅक्टर भरधाव वेगाने चालवल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती समोर येतेय. २० डिसेंबर रोजी हा अपघात झाला होता. विटभट्टीवर हे कुटुंबीय कामाला होते.
नांदुराकडून माणेगाव झाडेगाव शिवारात राहणाऱ्या सोनी सुभाष चव्हाण असं आईचं नाव आहे तर ८ वर्षांचा त्यांचा मुलगा या दुर्घटनेत मृत्युमुखी पडला. पती आणि मुलासोबत त्या ट्रॅक्टरमधून प्रवास करत होत्या. इंदोरे इथं विटभट्टीजवळ अचानक मायलेक ट्रॅक्टरवरून खाली पडले. मुलगा ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला आणि त्याचा जागीच अंत झाला.
advertisement
ट्रॅक्टरवरून पडल्यानंतर मुलाचा जागीच मृत्यू झाला तर आई सोनी चव्हाण या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र रुग्णालयात उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुभाष चव्हाण हा मध्य प्रदेशातून नांदुरा इथं मोलमजुरी करण्यासाठी कुटुंबासह आला होता. या प्रकरणाची नोंद पोलिसात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 22, 2023 10:50 AM IST
मराठी बातम्या/बुलढाणा/
Buldhana : ट्रॅक्टरमधून खाली पडले मायलेक, डोळ्यादेखत चाकाखाली चिरडला मुलगा तर आईचाही मृत्यू


