SUV पेक्षा 'बिजल्या' ठरला भारी, शेतकऱ्याला केलं लखपती, किंमत ऐकून सगळेच अवाक्

Last Updated:

बिजल्या हा काही साधासुधा बैल नाही. त्याने आतापर्यंत शंकरपट शर्यतीत अनेक वेळा भाग घेतला आणि पहिला क्रमांक पटकावला आहे.

News18
News18
रवी जयस्वाल, प्रतिनिधी
जालना : शेतात राबणारा बैल हा शेतकऱ्याचा मोठा आधार असतो. पण, आता याच आधाराने जालन्यात एका शेतकऱ्याला लखपती केलं आहे. जालन्यातील मंठा येथील एका शेतकऱ्याकडे असलेल्या बिजल्या नावाच्या बैलाने शेतकऱ्याचं नशीब पालटलं आहे. हा बिजल्या बैल तब्बल ११ लाख ११ हजारांना विकला गेला आहे. त्यामुळे पंचक्रोशीत या बिजल्याने एकच हवा केली आहे.
advertisement
जालन्यात एक बैल विकून शेतकरी लखपती झाला आहे. मंठा तालुक्यातील कानफोडी येथील पवन राठोड असं या शेतकऱ्याचं नाव आहे. पवन राठोड यांच्याकडे बिजल्या नावाचा एक बैल होता.  घोड्यालाही घाम फोडणारा अशी बिजल्याची ओळख आहे. बिजल्या हा बैलगाडा शर्यतीतला किंग आहे. त्याने आतापर्यंत २५ शर्यती जिंकल्या आहे. बिजल्याचा वेग आणि चपळपणा यामुळे बैलगाडा शर्यतीत त्याची दहशत होती. हेच पाहून सांगली जिल्ह्यातल्या कटरेवाडी येथील सागर कटरे यांनी हा बैल 11 लाख 11 हजार रुपयांना खरेदी केला आहे. त्यामुळं एक बैल विकून शेतकरी लखपती झाला आहे.
advertisement
बिजल्या शर्यतीचा किंग
बिजल्या हा काही साधासुधा बैल नाही. त्याने आतापर्यंत शंकरपट शर्यतीत अनेक वेळा भाग घेतला आणि पहिला क्रमांक पटकावला आहे. बिजल्याने जालन्यामधील बैलगाडा शर्यतीत भाग तर घेतलाच. पण, त्याने वाशिम, जिंतूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर इथंही अनेक शर्यतीत भाग घेतला. जवळपास ३० पेक्षा जास्त शर्यतीत त्याने भाग घेतला. आतापर्यंत त्याने २५ शर्यतीत पहिला क्रमांक पटकावल्या आहे. शर्यतीतून बिजल्याचे पहिले मालक पवन राठोड हे ४ लाखांपर्यंत कमाई करत होते.
advertisement
शर्यती जिंकणाऱ्या बिजल्या सोशल मीडियावरही स्टार आहे. इंस्टाग्रामवर त्याचे हजारो फॉलोअर्स आहे. अवघ्या ५ सेकंदात ६० पॉईंट धावणारा असा बिजल्या मराठवाड्यातला स्टार ठरला आहे. बिजल्याला पवन राठोड यांनी तामिळनाडूमधून १० महिन्याच्या असताना ५१ हजार रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. त्याची चांगली देखभाल केली. बिजल्याला रोज ३ लिटर दूध लागतं. तसंच बदाम, उडीद डाळ असा त्याचा रोजचा आहार आहे. एवढंच नाहीतर त्याला दोन दिवस आड गरम पाण्याने आंघोळ घालावी लागते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
SUV पेक्षा 'बिजल्या' ठरला भारी, शेतकऱ्याला केलं लखपती, किंमत ऐकून सगळेच अवाक्
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement