advertisement

CRIME : ज्याच्यासाठी केलं तोच पलटला! मिल्कशेक पाजून लेकीनेच काढला पोलीस बापाचा काटा, 36 महिन्यानंतर पोलीसही हादरले

Last Updated:

Chandrapur Crime : प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे आर्या बाल्लावार हिने वडील जयंत बाल्लावार यांना विष देऊन मारण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, मिल्कशेकमध्ये विष मिसळून जयंत यांना देण्यात आलं होतं.

Chandrapur Police Jayant Ballawar Murder Case
Chandrapur Police Jayant Ballawar Murder Case
Chandrapur Police Murder Case : प्रेमात आणि युद्धात सर्वाकाही माफ असतं असं म्हणतात, पण प्रेमात खून माफ नसतो हे देखील शिकवलं गेलं पाहिजे. याची प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. तब्बल 3 वर्षापूर्वी पोलीस कर्मचाऱ्याच्या झालेल्या खुनाचा छडा लागला असून या प्रकरणाने संपूर्ण चंद्रपुरात खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एका धक्कादायक खुनाचा थरार तब्बल 3 वर्षांनंतर उघड झाला असून, एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानेच आपल्या वडिलांचा काटा काढल्याचं समोर आलंय.

मिल्कशेकमध्ये विष मिसळून दिलं

स्वतःच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे आर्या बाल्लावार हिने वडील जयंत बाल्लावार यांना विष देऊन मारण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, मिल्कशेकमध्ये विष मिसळून जयंत यांना देण्यात आलं होतं. जयंत बाल्लावार हे देखील पोलीस विभागात कार्यरत होते आणि त्यांचा मृत्यू ड्युटीवर असतानाच झाला होता. मृतकाचा जावई आशिष शेडमाके याने पोलिसांकडे दिलेल्या कबुलीमुळे या हत्याकांडाचा उलगडा झाला. आर्याने आपल्या वडिलांना मिल्कशेकमध्ये विष मिसळून दिले होते.
advertisement

5 हजार रुपयांना विष घेतलं

आर्याने विष मावसभाऊ चैतन्य गेडाम याच्याकडून 5 हजार रुपयांना विकत घेतलं होतं, अशी माहिती देखील समोर आली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आर्या आणि आशिष यांनी लग्न केलं, परंतु नियतीने या गुन्ह्याचा हिशोब पूर्ण केला. लग्नानंतर आर्या आणि आशिष यांच्यात वारंवार वाद होऊ लागले. आशिषला त्याच्या बेशिस्त वर्तनामुळे पोलीस ट्रेनिंगमधून बडतर्फ करण्यात आले होते, तर आर्या सासरी न राहता माहेरीच राहत होती. त्यामुळे दोघांमध्ये सतत खटके उडायचे.
advertisement

पत्नीनेच वडिलांचा खून केल्याचा गौप्यस्फोट

नवरा बायकोच्या या वादातून संतापलेल्या आशिषने अखेर पोलीस ठाणे गाठलं आणि आपल्या पत्नीनेच वडिलांचा खून केल्याचा गौप्यस्फोट केला. ज्या मुलीने जोडीदारासाठी वडिलांचा जीव घेतला, त्याच जोडीदाराने हा गुन्हा उघड केला.रामनगर पोलिसांनी या प्रकरणी तत्परतेने कारवाई करत मुख्य आरोपी आर्या बाल्लावार, आशिष शेडमाके, चैतन्य गेडाम आणि विष पुरवणाऱ्या एका साथीदाराला अटक केली आहे. पोलिसांनी प्रकरणाला गांभीर्याने घेतलं असून यातून अनेक गोष्टींचा उलघडा होण्याची शक्यता आहे.
advertisement

संपूर्ण जिल्ह्यात खळबळ

दरम्यान, एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या त्याच्याच पोलीस असलेल्या मुलीने केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या हातांनीच कायद्याची पायमल्ली केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही पुरावे हाती लागतात का? याचा शोध देखील पोलीस घेत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/चंद्रपूर/
CRIME : ज्याच्यासाठी केलं तोच पलटला! मिल्कशेक पाजून लेकीनेच काढला पोलीस बापाचा काटा, 36 महिन्यानंतर पोलीसही हादरले
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement