रेशन कार्डसंदर्भातील महत्वाची अपडेट! 1 मेपासून या लाभार्थ्यांचे स्वस्त धान्य होणार बंद
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Ration Card Update : 1 मे 2025 पासून ज्या लाभार्थ्यांनी आपले रेशन कार्ड ई-केवायसी (e-KYC) अद्याप पूर्ण केलेले नाही, त्यांना सरकारकडून मिळणारे स्वस्त धान्य बंद करण्यात येणार आहे. राज्यातील रेकार्डधारकांना स्वस्त धान्य मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक करण्यात आले होते.
मुंबई : 1 मे 2025 पासून ज्या लाभार्थ्यांनी आपले रेशन कार्ड ई-केवायसी (e-KYC) अद्याप पूर्ण केलेले नाही, त्यांना सरकारकडून मिळणारे स्वस्त धान्य बंद करण्यात येणार आहे. राज्यातील रेकार्डधारकांना स्वस्त धान्य मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक करण्यात आले होते. त्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. अशा परिस्थितीत ज्या लाभार्थ्यांनी अजूनही e-KYC केले नाही अशांचे रेशन बंद होणार आहे.
शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यवधी गरजू नागरिकांना स्वस्त दरात तांदूळ, गहू, डाळी, साखर यांचा पुरवठा केला जातो. मात्र, अनेक ठिकाणी डुप्लिकेट किंवा अपात्र लाभार्थी रेशनचा लाभ घेत असल्याचे समोर आल्याने, शासनाने सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक केली आहे. यासाठी 30 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
advertisement
ई-केवायसी म्हणजे काय?
ई-केवायसी ही आधार कार्डाशी जोडलेली ओळखप्रक्रिया असून, त्यामार्फत लाभार्थ्याची खरी ओळख तपासून त्याचे रेशन कार्ड वैध ठरवले जाते. यामध्ये बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशन) प्रमाणीकरणाद्वारे प्रक्रिया पूर्ण केली जाते.
ई-केवायसी करण्याच्या पद्धती
1) ऑफलाइन पद्धत
राष्ट्रपुरवठा दुकानावर (FPS) जाऊन रेशन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक द्यावा लागतो. स्थानिक पुरवठादार बायोमेट्रिक प्रणालीद्वारे तुमची ओळख पटवतो आणि त्यानंतर ई-केवायसी पूर्ण होते.
advertisement
2) ऑनलाइन पद्धत
ज्यांना घरी बसून ई-केवायसी करायची आहे, त्यांनी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात –
सर्वप्रथम ‘Aadhaar FaceRD’ हे अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करा.
त्यानंतर तुमचा पत्ता आणि आधार क्रमांक टाका.
मोबाईलवर आलेला ओटीपी टाका.
त्यानंतर “Face-e-KYC” हा पर्याय निवडा आणि तुमचा चेहरा कॅमेर्याने स्कॅन करून अपलोड करा.
ई-केवायसी न केल्यास काय होईल?
ज्या लाभार्थ्यांनी 1 मे 2025 पूर्वी ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांचे रेशन कार्ड तात्पुरते निष्क्रिय (inactive) करण्यात येईल. यामुळे संबंधित कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणालीतून स्वस्त धान्य दिले जाणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 01, 2025 12:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रेशन कार्डसंदर्भातील महत्वाची अपडेट! 1 मेपासून या लाभार्थ्यांचे स्वस्त धान्य होणार बंद