112 वयोवृद्धांना मिळतो मायेचा आधार, इथं गेल्या 25 वर्षांपासून सुरू आहे अविरत सेवा, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर येथील कांचनवाडी परिसरात मातोश्री वृद्धाश्रम आहे. हे वृद्धाश्रम जवळपास गेल्या 25 वर्षांपासून सुरू असून जीवनाबाई तापडिया चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमार्फत चालते.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील कांचनवाडी परिसरात मातोश्री वृद्धाश्रम आहे. हे वृद्धाश्रम जवळपास गेल्या 25 वर्षांपासून सुरू असून जीवनाबाई तापडिया चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमार्फत चालते. ही संस्था विना अनुदानित तत्त्वावर काम करते. त्यामुळे शासनाकडून कुठलीही मदत या ठिकाणी मिळत नाही. सध्याच्या घडीला मातोश्री वृद्धाश्रमात 62 महिला आणि 50 पुरुष असे एकूण 112 जण येथे राहतात. एकशे बारा वृद्धांपैकी 75 टक्के वृद्धांना येथे सर्व सेवा मोफत पुरवली जाते. तर उर्वरित 25 टक्क्यांमध्ये ज्या लोकांची परिस्थिती चांगली असेल तर नाममात्र शुल्क घेण्यात येते, असे मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सागर पागोरे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
मातोश्री वृद्धाश्रमाला समाजाला आपले काहीतरी देणे आहे या भावनेतून सर्वसामान्य नागरिक देखील काही प्रमाणात देणगी येथे देतात तसेच ज्यांची परिस्थिती चांगली असेल अशा 25 टक्के नागरिकांकडून आकारण्यात आलेली नाममात्र रक्कम यावर वृद्धाश्रमाचा सर्व खर्च भागवला जातो.
येथील महिला पुरुषांचा सांभाळ करताना त्यांना काही सुविधा पुरवल्या जातात त्यामध्ये आठवड्यातील दर गुरुवारी आरोग्य तपासणी करणे, तसेच दर मंगळवारी पुरुषांचे शेव्हिंग कटिंग करून दिले जाते. वृद्धाश्रमात राहणाऱ्या सगळ्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. तसेच धार्मिक स्थळे दाखवणे, कौटुंबिक चित्रपट, नाटक दाखवणे अशा पद्धतीने त्यांचे मनोरंजन केले जाते.
advertisement
वृद्धाश्रमातील महिला पुरुषांची दिनचर्या सर्वसामान्यांपेक्षा थोडी वेगळी आहे. सकाळी साडे सहा वाजता यांना चहा, दूध देण्यात येते, 9 वाजता नाश्ता दिला जातो 10 वाजेच्या दरम्यान सामूहिक प्रार्थना होते. त्यानंतर वृत्तपत्र वाचन. त्यानंतर त्यांना आरामासाठी वेळ दिला जातो.
advertisement
मातोश्री वृद्धाश्रम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यासह विविध राज्यातून वृद्ध येत असतात. तसेच वृद्धाश्रमांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, बऱ्याचदा वृद्ध महिला पुरुष आहेत त्यांच्या शेवटच्या काळात त्यांची एकच इच्छा असते की आपल्या मुलाला, मुलीला भेटावे. मात्र काही वेळा त्यांच्या अंत्यसंस्काराला देखील ते येत नाहीत ही खूप मोठी शोकांतिका आहे त्यामुळे ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत, असे देखील पागोरे यांनी म्हटले आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
July 11, 2025 9:32 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
112 वयोवृद्धांना मिळतो मायेचा आधार, इथं गेल्या 25 वर्षांपासून सुरू आहे अविरत सेवा, Video

