माकड मेल्याचा फोन आला, देवीदास हातातलं काम सोडून पोहोचला, त्या कृतीचं कराल कौतुक!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधील देविदास थोरात यांनी भूतदयेचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते मृत माकडांवर विधिवत अंत्यसंस्कार करतात.
छत्रपती संभाजीनगर : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये कोणालाच कुणासाठी वेळ नसतो. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असतात. पण याच व्यस्त आणि धावपळीच्या जीवनामध्ये काही व्यक्ती निसर्गासाठी आणि मुक्या प्राण्यांसाठी काम करतात. त्यांच्या या भूतदयेची दखल समाजाला देखील घ्यावी लागते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवीदास थोरात या तरुणाचे प्राणीप्रेम सध्या चर्चेचा विषय ठरतंय. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवीदास थोरात हा तरुण देखील गेल्या अनेक वर्षांपासून मुक्या प्राण्यांसाठी काम करत आहेत. कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील निसर्गमित्र म्हणून त्यांची ओळख आहे. नाचनवेल येथे सकाळी 11 वाजेच्या सुमारास विद्युत तारेच्या धक्क्याने एक माकड मृत्युमुखी पडले. रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींनी नेहमीप्रमाणे निसर्गमित्र देवीदास थोरात यांना फोनवरून याबाबत माहिती दिली.
advertisement
माकड मेल्याची माहिती मिळताच देवीदास हे हातातील कामे सोडून तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर या माकडाला अंजना नदीपात्रात घेऊन गेले. वन विभागाला देखील सविस्तर माहिती दिली आणि या मृत माकडावर अंत्यसंस्कार केले. एखाद्या माणसाप्रमाणे माकडाचा दफनविधी झाला.
advertisement
दरम्यान, परिसरात कुठेही माकडाचा मृत्यू झाल्यास देवीदास हे त्याच्यावर अंत्यसंस्कार करतात. अपघातात जखमी असल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करतात. “गेल्या अनेक वर्षांपासून मी हे काम करत आहे. आपण देखील समाजासाठी काहीतरी देणे लागतो म्हणून हे काम करणे गरजेचे आहे,” असे देवीदास थोरात सांगतात.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
June 12, 2025 12:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
माकड मेल्याचा फोन आला, देवीदास हातातलं काम सोडून पोहोचला, त्या कृतीचं कराल कौतुक!

