Railway Update: छत्रपती संभाजीनगर- मनमाड रेल्वे धावणार ताशी 130 वेगाने, दीड तासात स्टेशनवर पोहोचणार!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर ते मनमाड या 126 किलोमीटरच्या मार्गावर रेल्वेगाड्यांची गती ताशी 130 किलोमीटरपर्यंत वाढविण्यास मंजुरी मिळाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते मनमाड या 126 किलोमीटरच्या मार्गावर रेल्वेगाड्यांची गती ताशी 130 किलो मीटरपर्यंत वाढविण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून रुळ बदलण्याच्या कामाला सुरुवात झाली. आता रेल्वे रुळाच्या बाजूने भिंत-कुंपण संरक्षक बांधण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. ताशी 130 कि.मी. वेगाने रेल्वे धावण्यास सुरुवात झाल्यानंतर मनमाडला जायला कमी वेळ लागणार आहे, त्यामुळे पुढील प्रवाशांना देखील मुंबईला जाण्यासाठी आधीच्या वेळेच्या तुलनेत दीड तास लवकर पोहोचणे शक्य होणार आहे.
देशातील 53 रेल्वे मार्गांवर ताशी 130 कि.मी. वेगाने रेल्वे चालविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या 53 मार्गांमध्ये छत्रपती संभाजीनगर ते मनमाड मार्गाचा समावेश आहे. सध्या या मार्गावर ताशी 100 कि.मी. वेगाने रेल्वे धावतात. हा वेग 130 कि.मी. पर्यंत वाढणार आहे.
advertisement
तब्बल दीड वर्षांनंतर रेल्वे सुसाट..!
रेल्वे रुळांवर अचानक पाळीव जनावरे येण्याची समस्या मोठी आहे. रेल्वेच्या वेग वाढीत ही बाब अडचणीची ठरते. त्यामुळे आता रेल्वे रुळाच्या कडेने संरक्षण भिंत-कुंपण तयार करण्यासाठी दमरेच्या नांदेड विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या कामासाठी 18 महिन्यांची मुदत असणार आहे. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनंतर रेल्वेचा वेग वाढेल.
advertisement
राज्यात येथे आहे 130 कि.मी. वेग
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सीएसएमटी ते कसारा, कर्जत दरम्यान तसेच अहमदनगर ते मनमाड द्रुतगती रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत निंबळक ते वांबोरी रेल्वे मार्ग आणि भुसावळ ते इगतपुरी विभाग पुणे ते दौंड आणि नांदेड सिकंदराबाद मार्गावर काही रेल्वे गाड्या 130 किलोमीटर वेगाने धावतात.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
July 16, 2025 9:52 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Railway Update: छत्रपती संभाजीनगर- मनमाड रेल्वे धावणार ताशी 130 वेगाने, दीड तासात स्टेशनवर पोहोचणार!


