संभाजीनगरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार, उड्डाण पुलाखाली तरुणावर कोयत्याने सपासप वार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानक उड्डाण पुलाखाली एका तरुणाची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली आहे.
अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानक उड्डाण पुलाखाली थरकाप उडवणारी घटना घडली आहे. इथं एका तरुणाची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे.
इमरान शेख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो रिक्षाचालक म्हणून काम करतो. बुधवारी रात्री उशिरा तो संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानक उड्डाण पुलाखाली आला असता चारचाकीमधून आलेल्या दोन जणांनी त्याला गाठलं आणि धारदार कोयत्याने त्याच्यावर वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, इमरान जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानक परिसरात उड्डाण पुलाखाली घडली. इमरान शेख (Imran Shaikh) असे हत्या झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. बुधवारी रात्री उशिरा कारमधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी इमरानवर कोयत्याने सपासप वार केले. हल्लेखोरांनी अचानक केलेल्या या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
advertisement
हल्ला केल्यानंतर आरोपी हल्लेखोर लगेचच त्यांच्या कारमधून घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली आणि पंचनामा केला. पुढील तपासणीसाठी मृतदेह तातडीने घाटी रुग्णालयात हलवण्यात आला. हत्या करण्यामागचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 02, 2025 8:32 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार, उड्डाण पुलाखाली तरुणावर कोयत्याने सपासप वार