Pimpri – Chinchwad News: ऐन पावसाळ्यात पाणी महागलं, पिंपरी चिंचवड MIDC कडून दरवाढ, किती मोजावे लागणार?

Last Updated:

Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवड एमआयडीसी परिसरातील लघु उद्योजक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. त्यातच एमआयडीसीने नुकतीच पाणी दरात वाढ केली आहे.

Pimpri – Chinchwad News: ऐन पावसाळ्यात पाणी महागलं, पिंपरी चिंचवड MIDC कडून दरवाढ, उद्योजकांचा संताप
Pimpri – Chinchwad News: ऐन पावसाळ्यात पाणी महागलं, पिंपरी चिंचवड MIDC कडून दरवाढ, उद्योजकांचा संताप
पुणे: ऐन पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड एमआयडीसीने औद्योगिक पाण्याच्या दरात वाढ केलीये. पूर्वीच्या 21.50 रुपये प्रति घनमीटरवरून पाण्याच्या दरात वाढ करून ते आता 24.25 रुपये केले आहेत. यामुळे लघु व मध्यम उद्योगांमध्ये नाराजी पसरली आहे. वीजदर, कच्चा माल महाग होणे आणि कामगार तुटवडा यामुळे उद्योग आधीच त्रस्त आहेत, आता पाण्याच्या वाढलेल्या दरांमुळे उत्पादन खर्च अजून वाढवेल. म्हणून ही दरवाढ रद्द करावी, अशी मागणी उद्योजकांकडून केली जात आहे.
दर वाढीवर उद्योजकांचा नाराजीचा सूर
पिंपरी-चिंचवड एमआयडीसीकडून घरगुती ग्राहकांसोबत सुमारे 3,800 औद्योगिक ग्राहकांना पाणीपुरवठा केला जातो. यासाठी आधी प्रति घनमीटर 21 रुपये 50 पैसे दर आकारला जात होता. आता यात 2.75 रुपये वाढ करून नवीन दर 24 रुपये 25 पैसे केला गेला आहे. एमआयडीसी प्रशासनानुसार, 2013 नंतर म्हणजे तब्बल 12 वर्षांनी ही नाममात्र दरवाढ करण्यात आली आहे.पिंपरी चिंचवड उद्योगनगरीतील एमआयडीसीमध्ये लघु उद्योजकांची संख्या अधिक आहे. सध्या खड़े पडलेले रस्ते, सतत खंडित होणारा वीजपुरवठा याचा परिणाम व्यवसायावर होत असताना आता पाणी दरवाबीमुळे लघुउद्योजक चिंतेत आहेत.
advertisement
पिंपरी-चिंचवड एमआयडीसी परिसरातील लघु उद्योजक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. एमआयडीसीने नुकतीच पाणी दरात वाढ केली आहे. मुळात एमआयडीसीकडून नियमीत पाणीपुरवठा होत नाही; पाणी पुरेशा दाबाने येत नाही आणि आले तरी केवळ दोन तास येते. त्यामुळे उद्योजक त्रस्त आहेत. पाण्याच्या दरवाढीमुळे उद्योगांवर अतिरिक्त ताण आला आहे. लघु उद्योजक सलीम शिकलगार यांनी पाण्याचे दर कमी करून उद्योजकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.
advertisement
आधीच उद्योग क्षेत्राला वीज दरवाढ, कच्च्या मालाचे वाढते भाव आणि कामगार तुटवडा अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेलाही कर भरावा लागतो. त्यात पाण्याच्या दरवाढीमुळे उत्पादन खर्च आणखी वाढणार असून, लघु आणि मध्यम उद्योग सर्वात जास्त अडचणीत येतील, असे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.
मराठी बातम्या/पुणे/
Pimpri – Chinchwad News: ऐन पावसाळ्यात पाणी महागलं, पिंपरी चिंचवड MIDC कडून दरवाढ, किती मोजावे लागणार?
Next Article
advertisement
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement