NHM Pune Bharti 2025: घाई करा! पुणे महानगर पालिकेसाठी नोकरीची संधी, शेवटची तारीख 7 ऑक्टोबर
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
NHM Pune Recruitment 2025 : डॉक्टर क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. एमबीबीएस आणि बीएएमएस झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय अधिकारी पदासाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. 'वैद्यकीय अधिकारी' या पदाच्या माध्यमातून नोकरभरती केली जाणार आहे.
पुणे: तरूण उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर पालिकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत नोकरीच्या संधी आहेत. डॉक्टर क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. एमबीबीएस आणि बीएएमएस झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय अधिकारी पदासाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. 'वैद्यकीय अधिकारी' या पदाच्या माध्यमातून नोकरभरती केली जाणार आहे. 26 सप्टेंबरपासून सुरू झालेली भरती प्रक्रियेची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर आहे. 'वैद्यकीय अधिकारी' पदासाठीची शैक्षणिक पात्रता किती? अर्जदाराची वयोमर्यादा किती? जाणून घेऊया...
पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या माध्यमातून केली जाणारी ही नोकरभरती कंत्राटी पद्धतीने केली जात आहे. एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS (MCI/ MMC) ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. तर बीएएमएस वैद्यकीय अधिकारी पदासाठी BAMS ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. ही नोकरभरती ऑनलाईन पद्धतीने नसून थेट मुलाखतीतून अर्जदारांची निवड केली जाणार आहे. मुलाखतीला कॉल आला म्हणजे, निवड झाली या विचारामध्ये अर्जदाराने राहू नये. जेमतेम 22 पदांसाठी नोकर भरती होणार आहे. जातनिहाय निवड केली जाणार आहे.
advertisement
अनु.जाती-3, अनु. जमाती-2, विजाअ-1, भज.ब-1, भज.क-1, भज.ड-1, इमाव-4, एस.ई.बी.सी-2, ई.डब्ल्यू.एस.-2, अराखीव-5 या प्रमाणे एकूण 22 पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. सहसंचालक (तांत्रिक) यांचे दि. 14/02/2025 रोजीच्या पत्रानुसार वैद्यकीय अधिकारी पदाकरीता M.B.B.S. पदवीधारकांची नियुक्ती करणेकरीता प्राधान्य देण्यात येईल. परंतु प्रयत्न करूनही M.B.B.S. पदवी धारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास वैद्यकीय अधिकारी म्हणून M.B.B.S. पदवीधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अथवा 6 ते 11 महिन्याकरिता B.A.M.S. पदवीधारक उमेदवारास वैद्यकीय अधिकारी म्हणून तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल. पुणे महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ https://www.pmc.gov.in वर अटी व शर्ती पाहण्यात यावे.
advertisement
अर्जदाराचे कमीत कमी वय 60 तर जास्तीत वय 70 इतके तरी हवे आहे. ऑनलाईन पद्धतीने निवडप्रक्रिया होणार नसून थेट मुलाखतीच्या माध्यमातून ही निवड प्रक्रिया केली जाणार आहे. पुणे महानगर पालिकेच्या अखत्यारीत येणारी ही भरती प्रक्रियेची मुलाखत पुण्यातच होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जुना जी. बी. हॉल तिसरा मजला, शिवाजी बर, पुणे महानगरपालिका, पुणे 411005, असा मुलाखतचा पत्ता आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा जाहिरातीचा PDF पाहावा आणि त्यानंतरच अर्ज करावा. मुलाखतीची तारीख 7 ऑक्टोबर 2025 असून अर्ज करण्याची शेवटची तारीखही 7 ऑक्टोबरच आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 01, 2025 9:33 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
NHM Pune Bharti 2025: घाई करा! पुणे महानगर पालिकेसाठी नोकरीची संधी, शेवटची तारीख 7 ऑक्टोबर