संत एकनाथ महाराज यात्रोत्सव, पैठणला जाणाऱ्या वाहतुकीत मोठे बदल, गैरसोय टाळण्यासाठी पाहा पर्यायी मार्ग
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Nathshashti Yatra Paithan: नाथषष्ठी निमित्त पैठणमध्ये संत एकनाथ महाराज यांचा यात्रोत्सव होतो. याला राज्यातून मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ महाराज नाथषष्ठी निमित्त पैठण येथे 5 दिवस यात्रोत्सव आहे. मंगळवारपासून यात्रोत्सवाला प्रारंभ होत असून राज्यभरातून 12 ते 15 लाखांवर भाविक याठिकाणी पायी दिंडी आणि वाहनांच्या माध्यमातून येत असतात. त्यामुळे मंगळवार ते शनिवार या काळात वाहतूक कोंडीची शक्यता असते. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पैठणकडे जाणाऱ्या व येणाऱ्या जड वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.
पूर्वीचा मार्ग
शहागड-आपेगावमार्गे पैठणकडे पाचोड-पैठण-बिडकीन-इसारवाडी- अहिल्यानगर हायवे
सोलापूर-धुळे-एनएच - 52 महामार्ग कचनेर फाटा, पोरगाव चौफुली, बिडकीन – शेकटा
इसारवाडी फाटा छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हायवे मार्गे अहिल्यानगरकडे
जालन्याकडून करमाड - कचनेर फाटा - पोरगाव – बिडकीनचे
advertisement
पर्यायी मार्ग हे असतील
शहागड - पाचोड मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाईल.
पाचोड-आडूळ-छत्रपती संभाजीनगर बायपास मार्गे अहिल्यानगरकडे.
सोलापूर धुळे एनएच-52 महामार्ग बीड कडून येणारी जड वाहतूक ही एनएच-52 मार्ग ते सरळ पुढे ए-एस क्लब मार्गे छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर हायवेने अहिल्यानगरकडे जातील. याचप्रमाणे उलट दिशेने वाहने ये जा करतील.
जालन्याकडून येणारी जड वाहतूक ही करमाड कचनेर फाटा – सोलापूर धुळे एनएच-52 महामार्ग ते सरळ पुढे ए. एस. क्लब मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे किंवा अहिल्यानगरकडे जातील. या प्रमाणेच उलट दिशेने वाहने ये-जा करतील.
advertisement
छत्रपती संभाजीनगर वाळूज, पैठणखेडा, रांजणगाव, खैरी शेकटा, ब्रह्मगव्हाण - लोहगाव – जळगाव, लोहगाव फाटा -ढोरकीनमार्गे पैठणकडे जातील. या प्रमाणेच उलट दिशेने वाहने ये-जा करतील.
छत्रपती संभाजीनगर पाचोड मार्गे पैठणकडे जातील. या प्रमाणेच उलट दिशेने वाहने ये-जा करतील.
शेवगाव - नेवासा फाटा-वाळूजमार्गे-छत्रपती संभाजीनगरकडे जातील.
शेकटा इसारवाडी फाटा - छत्रपती संभाजीनगर ते -अहिल्यानगर हायवे मार्गे अहिल्यानगरकडे अथवा छत्रपती संभाजीनगरकडे वाहने जातील.
advertisement
छत्रपती संभाजीनगर ते बिडकीन – पैठणकडे वाहने जातील.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
March 18, 2025 11:06 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
संत एकनाथ महाराज यात्रोत्सव, पैठणला जाणाऱ्या वाहतुकीत मोठे बदल, गैरसोय टाळण्यासाठी पाहा पर्यायी मार्ग


