आई-वडील नाहीत, सुरू केलं वृद्धाश्रम! सरकारी मदत नाही, हे दाम्पत्य मसाज सेंटरच्या पैशातून करतंय 30 जणांचा सांभाळ!

Last Updated:

Inspiring Story: कृपाळू वृद्धाश्रम संस्थापक संतोष सुरडकर हे मसाज व्यवसाय करतात. त्यांच्या कमाईतून वृद्धाश्रमाचा खर्च भागवला जातो.

+
आई-वडील

आई-वडील नाहीत, सुरू केलं वृद्धाश्रम! सरकारी मदत नाही, मसाज सेंटरच्या पैशातून 30 जणांचा सांभाळ!

छत्रपती संभाजीनगर : सध्याच्या काळात बदलत्या सामाजिक आणि कौटुंबिक स्थितीत सर्वांनाच आई-वडिलांचे महत्त्व समजते असं नाही. त्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरमधील एक दाम्पत्य अशाच आजी-आजोबांचा सांभाळ करत आहे. रंजना आणि संतोष सुरडकर या दाम्पत्याने पहाडसिंगपुरा येथे 'कृपाळू' या नावाने वृद्धाश्रम सुरू केला असून ते 30 हून अधिक जणांची काळजी घेत आहेत.
कृपाळू वृद्धाश्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या वृद्ध महिला आणि पुरुषांचा असे 30 जणांचा सांभाळ या ठिकाणी केला जातो. या वृद्धाश्रमाला कुठलाही शासकीय किंवा राजकीय पाठिंबा नाही. कृपाळू वृद्धाश्रम संस्थापक संतोष सुरडकर हे मसाज व्यवसाय करतात. त्यांच्या कमाईतून वृद्धाश्रमाचा खर्च भागवला जातो. तसेच कुणी स्वतःहून मदत केल्यास त्याचा देखील स्वीकार करून, कृपाळू वृद्धाश्रम चालवण्यासाठी हातभार लागतो. या कामातून समाधान मिळत असल्याचे सुरडकर यांनी सांगितले.
advertisement
शहरातील पहाडसिंगपुरा परिसरात 3 वर्षांपूर्वी कृपाळू वृद्धाश्रम सुरू झालेले आहे. वृद्धाश्रम चालवण्यासाठी आर्थिक अडचणी भरपूर येतात, काही नागरिक या ठिकाणी किराणा सामान, विविध वापरात येणाऱ्या वस्तू, आर्थिक सहकार्य करतात. त्यामुळे हे वृद्धाश्रम चालवण्यास मदत होते. सुरडकर यांना आई-वडील नाहीत. त्यामुळे वृद्धाश्रमातल्याच वृद्ध महिला व पुरुष यांना आई-वडील मानून ते त्यांची सेवा करत आहेत.
advertisement
सुरडकर दाम्पत्यच करते सर्व कामे
रूमची साफसफाई करणे, फर्शी पुसणे, वृद्धांना आंघोळ करण्यासाठी मदत करणे, स्वयंपाक तयार करणे असे विविध कामे संतोष आणि त्यांच्या पत्नी रंजना सुरडकर या स्वतः करतात. या कामामुळे आनंद आणि समाधान मिळत असल्याचे देखील ते सांगतात. तसेच यानंतर वृद्धाश्रमाची संख्या वाढू नये म्हणून तरुण पिढीने आई-वडिलांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करणे गरजेचे आहे. कारण आपण त्यांच्यामुळे जग पाहतो आणि त्यांना सांभाळणे हे आपले कर्तव्य असल्याचे देखील सुरडकर सांगतात.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आई-वडील नाहीत, सुरू केलं वृद्धाश्रम! सरकारी मदत नाही, हे दाम्पत्य मसाज सेंटरच्या पैशातून करतंय 30 जणांचा सांभाळ!
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement